हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 20 रुग्ण तर 11 रुग्णांना डिस्चार्ज · 180 रुग्णांवर उपचार सुरु

 हिंगोली  जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 20 रुग्ण तर 11 रुग्णांना डिस्चार्ज
·  180 रुग्णांवर उपचार सुरु







        हिंगोली, दि.6:इमामोद्दीन शेख 
 जिल्ह्यात 20 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.
            फलटन 6 व्यक्ती, रामाकृष्णा सिटी 1 व्यक्ती, विवेकानंद नगर 3 व्यक्ती, शेवाळा ता. कळमनुरी 1 व्यक्ती, ब्राह्मण गल्ली कळमनुरी 1 असे 12 रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे तर  रिसाला बाजार 1 व्यक्ती, मेहराज कॉर्नर 2 व्यक्ती, पोस्ट ऑफीस रोड 2 व्यक्ती, शिवाजी नगर 1 व्यक्ती, फलटन 2 व्यक्ती असे 8 रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून            आले आहेत. तर 11 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
            जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 7 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 5 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 12 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 738 रुग्ण झाले असून, त्यापैकी 550 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 180 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 8 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या