राज्य सरकारने ई- पास अट रद्द करावी: आ.अभिमन्यु पवार

 राज्य सरकारने ई- पास अट रद्द करावी: आ.अभिमन्यु पवार







औसा मुख्तार मणियार

केंद्र सरकारने आंतरराज्य व राज्यांतर्गत खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठीचे निर्बंध उठविले आहेत,पण राज्य सरकारने खाजगी मालवाहतूक व प्रवासासाठी खासगी वाहनांना ई- पास बंधनकारक केला आहे ही अट नागरिकांसाठी जाचक आहे. तेव्हा राज्य सरकारने तात्काळ ही अट रद्द करावी,अशी मागणी आ अभिमन्यु पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्य सरकारने राज्यांतर्गत एस.टी.प्रवासाला परवानगी दिली आहे त्यांना ई- पासची गरज नाही पण नागरिक, व्यापारी यांना उद्योग- व्यापार व अन्य कामानिमित्त राज्यातील अथवा राज्यांतर्गत व खासगी वाहनांचे प्रवास मालवाहतूक करावी लागते त्यासाठी ई- पास काढणे कठीण होत आहे.राज्य सरकारने तात्काळ ई- पास अट रद्द करावी,अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यु पवार यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या