*परंडा शहरातील वाढलेले "घाणीचे साम्राज्य" यावर जिल्हाधिकारी यांना मनसेचे निवेदन.*
*जनसामान्यांच्या विषयावर जिल्हाधिकारी दालनाबाहेर ठिय्या आंदोलनाचा ईशारा*
*तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आश्वासन.*
उस्मानाबाद (जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) परंडा शहरातील सध्या स्वच्छतेचा उडालेला बोजवारा, प्रशासन नावाची कोणती अशी संस्था कार्यरत असल्याचा पुरावा निदर्शनास न येणे,कोरोना सारखा महाभयंकर आजार व लॉक डाऊन आणि त्यानंतर शहरात साथीच्या आजाराला कारणीभूत अशी उदभवलेली घाणीची परिस्थिती,बस स्थानक परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य,प्रत्येक गल्ली-बोळांमध्ये तुंबलेल्या गटारी तसेच शहरात मोकाट जनावरांचा वाढलेला सुळ-सुळाट,रस्त्यावर मोकाट पणे फिरणाऱ्या जनावारांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढीची शक्यता, अपघातांमुळे होणारी जीवितहानी,रस्त्यावर,दुकानांच्या समोर सर्रासपणे पडलेल्या जनावरांच्या विष्ठा,शेण,मोकाट जनावरांच्या हैदोषाने हवालदिल झालेले शहरातील व्यापारी आणि शहरालागतचे शेतकरी या अश्या अनेक तक्रारी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शाबीर भाई शेख तसेच मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या असल्याने.तसेच परंडा शहरातील लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या या विषयांवर परंडा नगरपरिषद प्रशासन कोणतीही उपाययोजना करतांना दिसून येत नाही म्हणून जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून या विषयावर तोडगा काढावा तसेच आठवड्या भरात या विषयावर तोडगा न निघाल्यास पीडित व्यापारी, शेतकरी,शहरातील जनसामान्य यांना घेऊन जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडणार असल्याचे आणि या आंदोलनातील होणाऱ्या परिणामांना परंडा येथील ढिसाळ आणि निष्क्रिय नगरपरिषद प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल अश्या आशयाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.तसेच ते स्वतः परंडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना या विषयी बोलणार असल्याचे आणि जनसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या,स्वच्छतेच्या महत्त्वपूर्ण विषयावर तात्काळ तोडगा काढणार असल्याचे माननीय जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी गपाट साहेब,महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्षा वैशालिताई गायकवाड, उप-जिल्हा अध्यक्ष शाबीर भाई शेख,उप-जिल्हा अध्यक्ष दत्ताजी बोंदर,उस्मानाबाद तालुका अध्यक्ष पाषाभाई शेख,कळंब तालुका अध्यक्ष सागर बारकुल, विभाग अध्यक्ष विलास बंडगर तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.