कोविड-19 चे जिल्ह्यात नवीन 47 रुग्ण तर 56 रुग्णांचा डिस्चार्ज
· 195 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली, दि.3: जिल्ह्यात 47 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.
यामध्ये हिंगोली शहरातील छत्रपती नगर, शासकीय वसाहत तहसीलजवळ, गाडीपुरा, कृष्णा मेडिकल जवळ, नाईक नगर, आझम कॉलनी, राम गल्ली , जगदंब हॉस्पीटल, गंगा नगर, काबरा जिनींग जवळा पळशी रोड, पलटन गल्ली, तोफखाना, तालाबकट्टा, भोईपुरी येथील प्रत्येकी 1 व्यक्ती तर पेन्शनपुरा हिंगोली येथील 6 व्यक्ती, श्रीनगर येथील 6 व्यक्ती, काजीपुरा येथील 2 व्यक्ती, हरण चौक येथील 2 व्यक्ती, दत्तमंदिर जवळ मंगळवारा येथील 2 व्यक्ती, मस्तानशहा नगर येथील 4 व्यक्ती, बुरसे गल्ली कळमनुरी येथील 8 व्यक्ती, वरुड चक्रपान हिंगोली येथील 1 व्यक्ती, गोरेगाव हिंगोली येथील 1 व्यक्ती, कळमनुरी शहर येथील 1 व्यक्ती असे एकुण 47 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
तसेच 56 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथे भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 18 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 22 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 709 रुग्ण झाले असून त्यापैकी 506 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 195 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 8 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.
****
हिंगोली शहरातील काही भाग तसेच गोरेगाव कंटेनमेंट झोन घोषित
· सेनगाव तालुक्यातील प्रभाग क्र. 1 व 10 मधील काही भाग प्रतिबंध मुक्त
हिंगोली,दि.3: हिंगोली शहरातील माहेश्वरी भवन ते जमादर विहिर, सत्यनारायण गणपती मंदिरापर्यंतचा परिसर, तर सेनगांव तालुक्यातील गोरेगांव येथील वार्ड क्र. 01, 04, 05 व 06 याठिकाणी कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव इतरत्र होवू नये यासाठी सर्व भाग/गावचे संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. प्रशासनामार्फत या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा नगर परिषद मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
सेनगाव तालुक्यातील प्रभाग क्र. 01 बालाजी नगर व प्रभाग क्र. 10 समता नगर प्रतिबंध मुक्त
सेनगाव तालुक्यातील प्रभाग क्र. 01 बालाजी नगर व प्रभाग क्र. 10 समता नगर येथे कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला होता. त्याचा कालावधी संपुष्टात आल्याने सदर परिसर आता प्रतिबंध मुक्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.