अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या: लहुजी साळवे कर्मचारी महासंघाची मागणी.
औसा मुख्तार मणियार
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान असणारा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे.अशी मागणी औसा येथील लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने औसा तहसिलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना दि.६ आॅगस्ट २०२० गुरुवार रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनात दिड दिवस शाळा शिकून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई येथे सामान्य कामगार म्हणून काम करताना कामगारांच्या व्यथा मांडण्यासाठी क्रांतीकारी चळवळ अण्णाभाऊ साठे यांनी केली.कथा ,कांदब-या आणि शाहीरीच्या माध्यमातून शोषित, पीडित समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडून समाज जागृती करण्याचे कार्य त्यांनी करुन शोषितांना नवी दिशा दिली आहे.अण्णाभाऊसाठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांनी केलेल्या दलित, शोषित, पीडित समाज उद्धाराचे कार्य हे प्रेरणादायी आहे.त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे,अशी मागणी लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्या वतीने औसा तहसिल कार्यालय येथे औसा तहसिलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष संभाजी शिंदे, सेक्रेटरी संभाजी नामवाड, डॉ श्रीमंत क्षीरसागर, जालिंदर बनसोडे,राम शिंदे, महिला प्रतिनिधी उषा गायकवाड, नगरसेविका अॅड मंजुषा कसबे, बालाजी पाटोळे आदिच्या स्वाक्ष-या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.