आंदोरा येथील १५अॉगस्ट रोजी ३५ जणांचे रक्तदान
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील आंदोरा येथे स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले.सध्या कोरोना संकटाच्या पाश्र्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.यासाठी १५ अॉगस्ट रोजी राष्ट्रीय उत्सव साजरा करीत असताना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून येथील रमेश शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात गावातील ३५ जणांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.या कार्यक्रमास पंचायत समितीचे सदस्या रेखा नागराळे, मनसेचे तालुकाप्रमुख शिवकूमार नागराळे,औसा तहसिलचे नायब तहसिलदार पटे,गावचे सरपंच, पोलिस, पाटील, चेअरमन आदिसह नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.