हिराजी कांबळे यांना पोलीस प्रशासनाकडून मदत..
*मोईज सितारी*
निलंगा:- येथील हिराजी कांबळे हा आपल्या वडिलोपार्जित दवंडीचा व्यवसाय करून आजतागायत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवनारा. परंतु संपूर्ण देशात व महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना विषाणूने थैमान घातल्याने या संसर्गजन्य रोगाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी लॉकडाऊन केल्याने या लॉकडाऊनच्या काळात हिराजी कांबळे यांना दवंडी देण्याचे काम न मिळाल्याने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली.
सहज एकेदिवशी निलंगा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व सचिव हिराची कांबळे यांच्या घरासमोरून जात असताना हिराजी कांबळे यांनी आपल्या दारात बसलेला पाहून काय चाललंय हिराजी असे विचारले असता, हिराजी कांबळे यांनी आपल्या सर्व व्यथा मांडल्या. हिराजींचे व्यथा ऐकून निलंगा तालुका पत्रकार संघाने त्यांची दखल घेऊन त्यांची "ए"एम न्यूज या इलेक्ट्रॉनिक न्यूज चैनल (मीडिया)च्या माध्यमातून त्यांच्या व्यथा प्रशासनाच्या व जनतेच्या निदर्शनास आणून देऊन हिराजी कांबळे यांना मदत करण्याचे आवाहन निलंगा तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले होते. लॉकदाऊनच्या काळात निलंगा पोलीस प्रशासनाने अनेक गोरगरीब कुटुंबांना धान्य वाटप करून माणुसकी जोपासली आहे. त्यासपद्धतीने या बातमीचीही दखल घेऊन निलंगा पोलीस प्रशासनाकडून गृह उपयोगी, जीवनावश्यक वस्तूंचे किट हिराजी कांबळे यांना देत असताना पोलीस निरीक्षक अनील चोरमले, गोपनीय शाखा प्रमुख प्रणव काळे, बाळासाहेब नागमोडे, शितल सिंदाळकर, बालाजी मस्के, निलंगा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ काळगे, सचिव झटिंग (अण्णा) म्हेत्रे, ए"एम न्यूज चैनलचे प्रतिनिधी साजिद पटेल,सा. निळकंटेश्वर समाचारचे संपादक विशाल हलकीकर आदी उपस्थित होते.
ददवंडीवाल्या हिराजीकडे राजकीय पक्ष, नगरपालिकेचे दुर्लक्ष..?
हिराजी कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून येथील राजकीय पक्ष व नगरपालिकेचे जनतेला दवंडीच्या माध्यमातून सूचना देण्याचे काम करत आहेत. या लॉकडाऊनच्या काळात हिराजी कांबळे यांना साधी विचारपूस सुद्धा कोणी केली नाही. निलंगा तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांना पोलीस प्रशासनाकडून का होईना गृह उपयोगी जीवनावश्यक वस्तूंचे किट तरी मिळाले. हेच भाग्य समजावे लागेल.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.