आईच्या स्मरणार्थ बेघर निवारण केंद्र रोटी कपडा बँक येथे प्रमोद केंद्रे यांनी केले वृक्षारोपण.
( व्यंकटराव पनाळे, जिल्हा प्रतिनिधी )
लातुर : दि. २१ - उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरणासाठी सदैव कार्य करणारे ऑक्सीजन ग्रुप महाराष्ट्र या संस्थेचे सचिव प्रमोद केंद्रे यांच्या मातोश्री वैकुंठवासी श्रीमती शेषीकलाबाई केंद्रे यांचे वयाच्या आडोसष्टाव्या वर्षी सहा ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
काल दिनांक २० ऑगस्ट रोजी वैकुंठवासी श्रीमती शेषीकलाबाई केंद्रे यांच्या स्मरणार्थ शहरी बेघर निवारण केंद्र रोटी कपडा बँक उदगीर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमोद केंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मृत्यू हे सत्य, वास्तव आहे...
सहा वर्षापूर्वी वडिल गेले. मागच्या वर्षी लहान भाऊ गेला. पंधरा दिवसापूर्वी आई सोडून गेली. मला या सर्व गोष्टी खूप वेदनादायक आहेत. वडिल गेले तेव्हा या दुःखातून मी लवकर सावरलो कारण आईचा मोठा आधार होता. तिने लहानपणा पासून लढायला शिकवले. संकटाचा सामना करायला शिकवलं. मागच्या वर्षी भाऊ वारला तरीही आईने मला धीर दिला. ती खरच धाडशी, दुःख पचवून उभे राहणारी एक कणखर स्त्री मला आईच्या रुपात मिळाली. आईने मला नेहमीच प्रोत्साहन आणी बळ दिलं. संकटाशी लढायला शिकवलं. पण ती आशा कठीण प्रसंगी मला सोडून गेली. तिच्या बदल काय काय सांगू... आता मला आईच्या आठवणी उचंबळून येत आहेत. प्रत्येक वेळा बळ देणारी, सामर्थ्य देणारी आई गेली. मी गळुन गेलो आहे. मार्ग सुचत नाही. शेवटी घरातला कर्ता मी एकमेव पुरुष आहे. त्यामुळे मला ऊभा राहवेच लागेल. कारण माझ्या समोर माझ्या परिवाराची सर्वस्वी जबाबदारी आहे. या कठीण काळात अनेक मित्र, स्नेही, हितचिंतकांनी मला मानसिक बळ देण्याच काम केलं. मृत्यू हे वास्तव आहे. प्रत्येकाचा जाण्याचा दिवस ठरला आहे. ज्याची वेळ संपली की त्याला जावेच लागते. हे वास्तवाची जाणीव तुम्ही सर्वांनी करुन दिलात. माझ्या आईला चिरशांती लाभावी यासाठी ईश्वराकडे मनपुर्वक प्रार्थना ही केलात. त्याबदल प्रमोद केंद्र यांनी या सर्वांचे शतशः ऋण व्यक्त केले आहे. आज आईच्या नावान वृक्षारोपण करून मी पुन्हा या जीवनरुपी मार्गावरून चालायला सुरुवात करत आहे. असेही प्रमोद केंद्रे यांनी सांगितले.
या प्रसंगी उदगीर येथील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक जाणीव असलेले सचिन पाटील, बांधकाम व्यवसायिक तानाजी कोनाळे, संजय देशमुख, युवराज निलंगेकर, सुरेश कांबळे, रोटी कपडा बँकचे गौस शेख, समीर शेख, अब्दुल हे यावेळी उपस्थित होते.
- व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार
९४२२०७२९४८
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.