बापाला न सांभाळणार्‍या पोरांना पिठासीन अधिकार्‍याचा दणका! दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचा दिला आदेश....

 

बापाला न सांभाळणार्‍या पोरांना पिठासीन अधिकार्‍याचा दणका!
दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचा दिला आदेश....




लातूर,दि.2८ः जन्मदात्या बापाचा म्हातारपणात सांभाळ न करणार्‍या दोन नोकरदार पोरांना लातूरचे उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी सुनील यादव यांनी आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम-२००७ कलम ५ नुसार दाखल झालेल्या अर्जाचा गांभीर्याने विचार करुन, दरमहा प्रत्येकी पाच हजार रुपये मिळून दरहा १० हजार रुपये बापाच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश , जा.क्र.२०१९/ज्येष्ठ ना./सिआ-१०० अन्वये,दि.२७ जुलै २०२० रेाजी  दिले आहेत.पांडुरंग गुणाजी सूर्यवंशी असे या पिडीत वडीलाचे नाव असून, ऍड.उदय गवारे यांनी त्यांची प्रभावीपणे  बाजू मांडली.
याबाबत अधिक वृत्त असे की, पांडुरंग गुणाजी सूर्यवंशी रा.सिध्दार्थ हौसिंग सोसायटी,लातूर येथील रहिवाशी असून, ते राज्य परिवहन महामंडळात वाहक होते.त्यांना पहिल्या पत्नीचे जयश्री,कोमल, कविता या मुली व  हर्षवर्धन, प्रज्ञारत्न ही मुले आणि दुसर्‍या पत्नीचा राजरत्न हा मुलगा असून, त्यांचे त्यांनी पालन पोषण,शिक्षण केले.पुढे दोन मुले,दोन मुली व एका सुनेला शासकीय-निमशासकीय नोकरीपर्यंत पोहोचविले.सेवानिवृत्ती नंतर आलेल्या पुंजीतून त्यांनी येथे पक्के घरही बांधले.काही दिवसांंनी या सर्वांनी पांडुरंग सुर्यवंशी यांना घराबाहेर हाकलून दिले.त्यामुळे नाविलाजाने ते नातेवाईक व मित्र परिवाराच्या मदतीने जगू लागले.तथापि आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम-२००७ कलम ५ नुसार त्यांनी लातूर उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी सुनील यादव याच्या कार्यालयात तक्रार दाखल करुन आपल्या जेवणखान,कपडालत्ता व इतर सोयीसाठी मुला-मुलींंकडून प्रत्येकी ४००० प्रत्येक २४ हजार रुपये पोटगी मिळावी, असा अर्ज  सन २०१७ मध्ये प्रकरण क्र.१७/२०१७ दाखल केला होता,त्यावर यातील तीन मुली व दोन मुले यांच्यात तडजोड होवून सुर्यवंशी यांचा आयुष्यभर सांभाळ करण्याचे २४ नोव्हेंबर २०१८ ठरले व प्रकरण बंद करण्यात आले.पुढे तीन-चार महिन्यातच त्यांना पुन्हा घरातून हाकलून लावण्यात आले म्हणून  पांडुरंग सूर्यवंशी यांनी दि.२४ फेबु्रवारी २०२० रोजी पुन्हा आपण वयोवृध्द असून,आर्थिक अडचण निर्माण होत असल्याने वरील सर्व सहा पाल्यांकडून २४ हजार रुपये पोटगी मिळावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी सुनील यादव यांच्या न्यायालयात विनंती केली. या प्रकरणी सर्व सहा पाल्यांना अनेक नोटीसा पाठविण्यात आल्या, दि.२७ जुलै २०२० रोजीही  ते सुनावणीस गैरहजर राहिले व आपले म्हणणेमांडले नाही. यावेळी पांडुरंग सूर्यवंशी यांनी मला सहा अपत्ये असून,प्रज्ञारत्न हा मजूरी करतो, मुली सरकारी नोकरीत असल्या तरी मला त्यांच्याकडून  पोटगी नको, हर्षवर्धन हा माध्यमिक शिक्षक व राजरत्न हा एसटीत कंडक्टर असून,त्याची पत्नी शिक्षिका असून ते आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याने या दोन मुलांकडून प्रत्येकी ६ हजार प्रमाणे १२ हजार रुपये दरमहा मिळावे असे म्हणणे मांडले.
या प्रकरणी उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी सुनील यांनी यांनी अर्जदाराने दाखल केले पुरावे,संचिकेतील कागदपत्रांचे अवलोकन करुन,अर्जदार हे वयोवृध्द आहेत, अर्जदाराच्या स्वष्टार्जित घरात गैरअर्जदार राहतात,ते अर्जदाराचा औषधोपचार खर्च, उदरनिर्वाह व सांभाळ करीत नाहीत,गैरअर्जदारांनी यापूर्वी अर्जदाराला सांभाण्यासंदर्भात तडजोड करुनही सांभाळ करत नाहीत, हर्षवर्धन व राजरत्न हे नौकरदार असल्याने त्यांची आर्थिक स्थिती चांगली असून,त्यांची पोटगी देण्याची ऐपत असल्याचे मान्य करुन,अर्जदाराचा अर्ज मंजूर केला आणि अर्जदाराच्या उदरनिर्वाह व औषध उपचारासाठी हर्षवर्धन व राजरत्न यांनी दरमहा प्रत्येकी ५००० हजार प्रमाणे एकूण १० हजार रुपये इतकी पोटगी द्यावी,ती दरमहा अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केल्याचे पुरावे या कार्यालयात द्यावेत,असा महत्वपूर्ण निर्णय,दि.२७ जुलै २०२० रोजी दिला.ऍड.उदय गवारे यांनी अर्जदाराची बाजू मांडली.
दरम्यान,या निर्णयाचे पांडुरंग सूर्यवंशी यांनी स्वागत केले असून, हा निकाल जन्मदात्याला नाकारणार्‍यांना कायद्याचा दणका असल्याचे मत व्यक्त केलेय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या