उर्जा कार्यक्षमता हे एक ध्येय आहे जे दैनंदिन जीवनात आणि कारखान्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या उर्जेचा कमी आणि पूर्ण वापर करणे होय - केदार खमितकर

 




उर्जा कार्यक्षमता हे एक ध्येय आहे जे दैनंदिन जीवनात आणि कारखान्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या उर्जेचा कमी आणि पूर्ण वापर करणे होय - केदार खमितकर





औसा :  शुक्रवार दि. २८ ऑगस्ट रोजी हिंदुस्थान एज्युकेशन सोसायटी संचालित अज़ीम व्यावसायिक ज्युनिअर कॉलेज आणि पीसीआरए यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन संस्थागत औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रम निशुल्क आयोजित करण्यात आले. प्राचार्य निज़ामुद्दीन शेख, विभाग प्रमुख सैयद कादिर, संयोजक विठ्ठल पत्तेवार, खराडे सर, शेटे सर, नजीर सर,  मोमीन सर  व पीसीआरए च्या  राज्य प्रादेशिक अधिकारी स्वाती कुमारी मॅडम आदी मान्यवरांची  प्रमुख उपस्थिती होती. मुख्य मार्गदर्शक पीसीआरए व्याख्याता केदार खमितकर(एनर्जी ऑडिटर) होते. या वेळी विद्युत, इलेक्ट्रॉनिक, यांत्रिकी, निर्माण, चिकित्सा प्रयोगशाला व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले. भारत हा जगातील पाचवा देश आहे ज्यामध्ये सर्वात कमी ऊर्जा कार्यक्षमता आहे, याचा अर्थ असा आहे की जीडीपीचे प्रमाण भारतातील ऊर्जा वापराचे आहे. म्हणूनच, ऊर्जावान देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताने जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने वाढीवर आणि उर्जेच्या कार्यकुशलतेवर कोणतीही तडजोड न करता कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. 
या प्रशिक्षणात ऊर्जा कार्यक्षमता ब्यूरो चे नॅशनल मिशन फॉर एनर्जी एफिशियन्सीच्या  विकसित केलेल्या कार्यक्षमतेबद्दल चर्चा करण्यात आले ज्याची तयारी औद्योगिक क्षेत्रात काम करणारया  विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. पेट्रोलियम कॉन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) ही भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेली सोसायटी आहे. 'ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर भारत' अभियान अंतर्गत लोकजागृती करण्यात येत असल्याची माहिती केदार खमितकर यांनी या वेळी दिली. 
WhatsApp Image 2020-08-28 at 5.00.06 PM.jpegWhatsApp Image 2020-08-28 at 5.00.07 PM.jpeg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या