वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय पुस्तकात नाव नोंदणीस प्रतिसाद


वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय पुस्तकात नाव नोंदणीस प्रतिसाद
लातूर ः लिंगायत महासंघाच्यावतीने प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली प्रकाशित होणार्‍या राज्यव्यापी वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय पुस्तकात नाव नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळत असून ही नाव नोंदणी 28 सप्टेंबर 2020 पर्यंत सुरू राहणार असल्याचे लिंगायत महासंघाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.
लिंगायत महासंघाच्यावतीने होणारा वधू-वर परिचय मेळावा यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर होणार नसून वीरशैव लिंगायत समाजातील वधू-वरांची सोय व्हावी म्हणून राज्यव्यापी वधू-वर परिचय पुस्तकाचे प्रकाशन यावर्षी करण्यात येणार असून या पुस्तकात वधू-वरांची नाव नोंदणी 21 जूलै 2020 पासून सुरू झाली असून या नाव नोंदणीस संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंधप्रदेशातून खुप प्रतिसाद मिळत आहे. ही नाव नोंदणी दि. 28 सप्टेंबर 2020 पर्यंत ही नावनोंदणी सुरू राहणार असुन वीरशैव लिंगायत समाजातील सर्व वीरशैव लिंगायत समाजासह पोटजातीच्या जंगम, माळी, कुंभार, तेली, सुतार, कोष्टी , फुलारी आदि सर्वांची नोंद करता येते. तसेच विधवा, विधूर, घटस्फोटीत, पुनर्विवाह करणार्‍यांनी सुध्दा आपले नाव नोंदवण्याची सोय केली आहे.
वधू-वर परिचय पुस्तकात नाव नोंदणीसाठी हेमंत नेलवाडकर, अंबुजा किचन वेअर्स, नंदी स्टॉप औसा रोड, लातूर येथे संपर्क साधावा.
तसेच लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.काशिनाथ राजे, शिवाजी भातमोडे, सिद्रामप्पा पोपडे, माणिकप्पा मरळे, माणिक कोकणे, जी.जी.ब्रह्मवाले, चंद्रकांत झुंजारे, परमेश्‍वर पाटील, विश्‍वनाथ मिटकरी आदिंशीही संपर्क करता येईल असे आवाहन लिंगायत महासंघाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या