सुशिक्षीत बेरोजगारांसाठी ऑनलाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय
रोजगार मेळाव्याचे आयोजन
हिंगोली दि.28: शेख इमामोद्दीन
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी खाजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या विद्यमाने दि. 31 ऑगस्ट, 2020 ते दि. 06 सप्टेंबर 2020 या कालावधीत ऑनलाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या मेळाव्यास सेक्युरिटी ॲण्ड इंटिलीजन्स सर्विस इंडिया लि., नरसिम्हा ॲटोकपोंटन्ट प्रा. लि., नव भारत फर्टिलायझर लिमीटेड या उद्योजकांनी सहभाग नोंदविला असून त्यांना अनुक्रमे सेक्युरिटी गार्ड, ट्रैनि इंजिनिअर ॲण्ड अप्रेंन्टिस, सेल्स रिप्रेझन्टेटिव्ह ही पदे भरावयाची आहेत.
रोजगार मेळाव्यास सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Employment/ रोजगार या पर्यायावर क्लिक करुन Job seeker / नोकरी साधक हा पर्याय निवडावा. युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉग-ईन करुन प्रोफाईल मधील ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ या पर्यायाद्वारे हिंगोली जिल्हा निवडून रोजगार मेळाव्यास ऑनलाईन अप्लाय करावे.
10 वी पास किंवा त्यापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता, अभियांत्रिकी पदवी व आयटीआय पास उमेदवारांनी सदर मेळाव्यास ऑनलाईन सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी प्रसिध्दी पत्राकान्वये केले आहे.
*****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.