लातूर शहरात कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथीक औषधाचे हवेतील फवारणीस प्रारंभ.

 लातूर शहरात कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथीक औषधाचे हवेतील फवारणीस प्रारंभ. 







लायन्स क्लब लातूर सेंट्रलने स्व. श्रीकृष्णजी सोनी यांच्या स्मरणार्थ महापालिकेच्या मदतीने लातूर शहर कोरोनामुक्तीसाठी टाकले पाऊल.  


लातुर : दि. १६ - लायन्स क्लब लातूर सेंट्रलने स्वर्गवासी श्रीकृष्णजी सोनी यांचे स्मरणार्थ लातूर महानगरपालिकेच्या मदतीने लातूर शहरांत होमिओपॅथिक औषधांचे हवेतील फवारणीस आज प्रारंभ केला आहे.  

या उपक्रमाचा शुभारंभ लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या शुभहस्ते आज १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता महात्मा गांधी चौकात फवारणीच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून होमिओपॅथिक औषधी फवारणीस सुरुवात झाली. लातूर शहरातील सर्वच मोठे रस्ते व लहान गल्लीबोळातही होमिओपॅथिक औषधांची हवेतील फवारणी करण्यात येणार आहे. या औषधांमध्ये आयुष मंत्रालय प्रमाणित आर्सेनिक अल्बम ३०, सेपिया २००, बेलाडोना २००, युपोटेरियम ३० या प्रमुख औषधी घटकांचा अंतर्भाव आहे. जेंव्हा या औषधांची फवारणी हवेमध्ये केली जाते तेंव्हा या औषधातील चैतन्यशक्ती च्या द्वारे त्याऔषधी गुणधर्माचे एक सुरक्षा चक्र तयार होते. वातावरणातील शुद्धता वाढून पंचेंद्रिया द्वारे शरीरामध्ये या प्रवेश करतात. व मानवाचे शरीरातील चैतन्य शक्ती वाढून रोगप्रतिकारक शक्ती प्रज्वलित होते. याच औषधांच्या फवारणीमुळे मालेगाव, वरळी (मुंबई), नागपूर इंदोर तसेच अहमदाबादच्या कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाल्याचे आढळून आले आहे.

या कार्यक्रमास उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, स्थायी समितीचे सभापती अँड. दिपक मठपती, महानगरपालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, माजी महापौर सुरेश पवार, नगरसेवक अशोक गोविंदपुरकर, सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी  लाइन्स क्लब लातूर सेंट्रल च्या वतीने सर्व मान्यवरांना ट्रॉफी  भेट देऊन स्वागत करण्यात आले. 

यावेळी लाँ. डॉ. श्यामसुंदर सोनी यांनी प्रास्ताविकात फवारणीच्या उपक्रमाबद्दल व होमिओपॅथिक औषधी बद्दल माहिती दिली. महापौर विक्रांत गोजमगुंडे, महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे, ज्येष्ठ नगरसेवक अशोकराव गोविंदपुरकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाँँ. डॉ. जयंती आंबेगावकर, लाँ. भरत हंचाटे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाँयन्सचे अध्यक्ष लाँ. चंद्रकांत धमगुंडे होते. होमिओपॅथिक तज्ञ लाँ. डॉ. श्यामसुंदर सोनी यांच्या पुढाकारातून ही औषधे  प्राप्त झाली आहे. लातूर महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त नंदा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधिकारी कलीम शेख यांच्या व्यवस्थापनात हा उपक्रम राबवला जात आहे.  

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लबचे अंजू सोनी, भरत हंचाटे, प्रसाद हंचाटे, राजु खंडेलवाल, राजकुमार अग्रवाल, शोभा धमगुंडे, प्रतीभा हंचाटे, श्रीकृष्ण कोटलवार, श्याम हरीयाणी, राजेश पत्रिके, अक्षय डावरे, रत्नप्रभा पत्रिके, दिलीप सोमाणी, हनुमंत भांगे, संध्या कोटलवार, रवी असोपा, पत्रकार अरुण समुद्रे यांनी विशेष प्रयत्न केले. लाँ. रवी असोपा यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून महानगरपालिकेचे कर्मचारी यांना विशेष धन्यवाद दिले.


- व्यंकट पनाळे, मुक्त पत्रकार 

   ९४२२०७२९४८

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या