सेवानिवृत्त प्रबंधक विश्‍वनाथ स्वामींकडून 101 परिवारांना कोरोना संकट काळात किराणा साहित्य वाटप

 

सेवानिवृत्त प्रबंधक विश्‍वनाथ स्वामींकडून 101 परिवारांना
कोरोना संकट काळात किराणा साहित्य वाटप












लातूर/प्रतिनिधी ः स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लातूर येथील विश्‍वनाथ त्र्यंबकअप्पा स्वामी सावळे व  त्यांच्या सुविद्य पत्नी शांतादेवी विश्‍नाथ स्वामी सावळे यांनी लातूर शहर व परिसरातील जवळपास 101 गरीब, वृध्द, निराधार परिवारांना किराणा साहित्याचे स्वयंस्फूर्तीने वाटप केले आहे. कोरोना महामारीच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेक कुटूंबांची दैनंदिन उदरनिर्वाहसाठी अक्षरशः दयनिय आवस्था निर्माण झालेली होती. अशा परिवारांची गरज ओळखून लातूर शहराच्या जुना औसा रोड परिसरात राहणार्‍या भेल हैद्राबादमधून सेवानिवृत्त प्रबंधक स्वामी यांनी आधार देण्याचे काम केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, सध्या सार्‍या जगात कोविड-19 महामारीने हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून या रोगावर अटकाव आनण्यासाठी सर्वांना सार्वजनिक रित्या वावर ठेवण्यावर प्रतिबंध करण्यात आलेला होता. अशा स्थितीत निव्वळ हातावर पोट असणार्‍या अनेक कुटूंबांना भाकरीचा चंद्र शोधण्याकामी मोठी कसरत करावी लागत होती. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली होती. ही बाब लक्षात घेऊन या परिस्थितीतून सावरण्यासाठी आणि गरीब, वयोवृध्द, बांधकाम मजूर, अपंग, फेरीवाले आणि निराधार परिवारांना मदतीचा एक हात दिला आहे. यामध्ये शहरातील 101 कुटूंबांना एक महिना पुरेल एवढा किराणा स्वामी यांनी स्वयंप्रेरणेने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी वाटप केला आहे.
याकामी सावळे स्वामी यांना त्यांच्या पत्नी शांतादेवी विश्‍वनाथ सावळे स्वामी, लातूर येथील अ‍ॅटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसैनिक त्र्यंबक स्वामी, हरंगुळ (खु.) येथील निळकंठ स्वामी यांनी प्रोत्साहनपर सहकार्य केले आहे. किराणा साहित्यामध्ये स्वखर्चातून स्वामी यांनी प्रत्येकी 10 किलो तांदूळ, 5 किलो गव्हाचे पिठ, मसूरदाळ, तूरदाळ, मुगदाळ, साखर प्रत्येकी एक किलो तेलपाकिट आणि अन्य जिवनाश्यक साहित्य असे जवळपास 20 किलो पेक्षा अधिक राशन त्यांनी सोशियल डिस्टन्सींगचे पालन करत वाटप केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या