अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्यांचा मृत्यू.
औसा : औसा - तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील टाका पाटी जवळ रस्ता ओलांडून शेताकडे जात असलेल्या शेतकऱ्यांला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. पाच) सायंकाळी घडली आहे. रामचंद्र नामदेव साळुंके (वय ५५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
रामचंद्र साळुंके हे बुधवारी सायंकाळी टाका पाटी येथे असलेल्या आपल्या शेतात रस्ता ओलांडून शेतात जात असताना औश्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात चारचाकीने जोराची धडक देऊन अज्ञात वाहन फरार झाले आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रामचंद्र या शेतकऱ्याला पुढील उपचारासाठी औसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकार्यानी सांगितले. रामचंद्र यांच्यावर औसा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर गुरूवारी सकाळी बेलकुंड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. ते बेलकुंड येथील पोलीस पाटील व्यंकट साळुंके यांचे ते बंधू होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.