तेजस्वी, प्रज्ञावंत विद्यार्थी घडवून संस्थेने गुणवत्तेचा जेएसपीएम ब्रँड निर्माण केला गुणवंताचा ऑनलाईन सत्कार ः अजितसिंह पाटील कव्हेकर यांचे प्रतिपादन

 

तेजस्वी, प्रज्ञावंत विद्यार्थी घडवून संस्थेने गुणवत्तेचा जेएसपीएम ब्रँड निर्माण केला
गुणवंताचा ऑनलाईन सत्कार ः अजितसिंह पाटील कव्हेकर यांचे प्रतिपादन  







लातूर दि.07/08/2020
जे.एस.पी.एम.शिक्षण संस्था आता 37 व्या वर्षात पदार्पण करीत असून प्रचंड मेहनत सेवाभावीवृत्ती आणि तेजस्वी, प्रज्ञावंत विद्यार्थी घडविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे जेएसपीएम संस्थेचा गुणवत्तेतून एक बॅ्रंड निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते कोरोना अन् लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमिवर जे.एस.पी.एम.संस्थेच्यावतीनेे महाराष्ट्र विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय,स्वामी दयानंद विद्यालय, शिवाजी विद्यालय , छत्रपती शिवाजी विद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित ऑनलाईन गुणवंताच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
ऑनलाईन सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेेच्या माजी अध्यक्षा तथा संस्थेच्या सचिव सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर,माध्यमिक शिक्षण अधिकारी औदुंबर उकिरडे, जे.एस.पी.एम.चे उपकार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, समन्वयक संचालक निळकंठराव पवार, शैक्षणिक संचालक संभाजीराव पाटील, समन्वयक बापूसाहेब गोरे, समन्वयक व्ही.बी.जाधव, प्राचार्य डॉ.आर.एस.अवस्थी, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मोहन खुरदळे, प्राचार्य जगपाल काळे, उपप्राचार्य मारूती सुर्यवंशी, प्राचार्य सचिदानंद जोशी, डॉ.शैलेश कचरे, प्राचार्य साखरे, मुख्याध्यापक संजय बिराजदार, मुख्याध्यापक गणेश कदम, मुख्याध्यापक आप्पासाहेब जाधव, मुख्याध्यापक देवानंद कोडतीवार, मुख्याध्यापिका अरूणा कांदे, मुख्याध्यापिका सुनिता मुचाटे, मुख्याध्यापक बिडवे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना अजितसिंह पाटील कव्हेकर म्हणाले की, केजी पासून पीजी पर्यंत शिक्षणाबरोबरच 11 वी 12 वी कला, वाणिज्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक व महाराष्ट्र नर्सिंग कॉलेज, नर्सिंग स्कूल, सेमी व मराठी माध्यमाच्या शाळा, किमान कौशल्य कॉलेज या माध्यमातून महाराष्ट्रभर जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून गुणवत्ता सिध्द केली जात आहे. यामुळे 10 वी बोर्ड परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे  व पालकांचे व शिक्षकवृंदाचेही अभिनंदन करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. तसेच दोन्ही हात नसलेला महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी ब्रम्हदेव लष्करे याच्या गणुवत्तेला भरारी देण्यासाठी संस्थेने त्याचा शैक्षणिक खर्च उचलला असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व प्राथमिक शिक्षण अधिकारी औदूंबर उकिरडे यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य गोविंद शिंदे यांनी केले. तसेच गुणवंत विद्यार्थी विवेक जाधव, सौरव निर्वळ, मुख्याध्यापक एम.एन.खुरदळे, पालक वलीपाशा शेख, शिक्षक कपाळे यांनी मनोगत व्यक्‍त केले. ऑनलाईन गुणवंताच्या सत्कार समारंभाचे सुत्रसंचलन अब्दुल गालिब शेख यांनी केले तर आभार मुख्याध्यापिक अरूणा कांदे यांनी मानले. यावेळी या ऑनलाईन सत्कार समारंभास पालक, विद्यार्थी, शिक्षक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या