*निलंगा तालुका पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण*
निलंगा:- निलंगा तालुका पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह निलंगा येथे आयोजित बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकारांनी अशोक बंगला येथे निलंगेकरांच्या निवासस्थानी जाऊन निलंगेकर कुटुंबीयांचे पत्रकारांच्या वतीने सांत्वन करण्यात आले .या प्रसंगी अशोकराव पाटील निलंगेकर, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, विजय पाटील निलंगेकर ,अरविंद पाटील निलंगेकर ,डॉक्टर अरुण डावळे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सबंध महाराष्ट्रामध्ये केलेल्या सिंचनाच्या योजना, विकास कामे, मुख्यमंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महिलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे असा आदेश सर्व राज्याला दिला होता त्या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्री असताना शासकीय शाळांमध्ये व खाजगी शाळांमध्ये पहिली ते बारावी पर्यंत मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय त्यांनी मुख्यमंत्री असताना घेतला होता. शिवाय निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी अनेक शासकीय कार्यालये , सिंचनाचे योजना त्याने निर्माण करून या भागाचा कायापालट करण्याचा केलेला प्रयत्न प्रेरणादायी ठरला असल्याच्या भावना उपस्थित सर्व पत्रकारांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात श्रीशैल बिराजदार,राम काळगे, संजय इंगळे, सुधीर रामदासी, झटिंग म्हेत्रे यांनी भावना व्यक्त केले. .याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष राम काळगे, सचिव झटिंगराव म्हेत्रे, संजय इंगळे,श्रीशैल बिराजदार, मोईज सितारी, शिवाजी पारेकर, सुधीरनाना रामदासी, समीर नाईक, मोहन क्षीरसागर, साजिद पटेल, हरिभाऊ सगरे,आयुब बागवान, द्रोणाचार्य कोळी, असलम झारेकर यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.