औसा ते बोरफळ जुन्या रस्त्यावर नाल्या तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर.

 औसा ते बोरफळ जुन्या रस्त्यावर नाल्या तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर.










औसा मुख्तार मणियार

औसा शहरातील सांडपाणी जुन्या बोरफळ रस्त्याच्या बाजुच्या नालीतून ओढ्याकडे जात असते, परंतु नाल्या तुंबल्यामुळे गावालगतच दुर्गंधी पसरत आहे.शहरातील सांडपाणी जुन्या बोरफळ रस्त्यावर बोरफळ वेशीजवळ रस्त्यावरील खड्डे पडून पाणी साचल्याने गावातील लोकांना पायी शेताकडे जाणा-या- येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.सदर रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. गटारी वरील साचलेल्या घाण पाण्यातून येणाऱ्या जाणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तसेच या रस्त्यालगतच मराठा, लिंगायत आणि राजपुत समाजाची स्मशानभूमी असून स्मशानभूमीकडे प्रेत सुध्दा घेऊन जाणे कठीण झाले आहे.सदर रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूच्या गटारीतील गाळाचा उपसा करुन गटारी दुरुस्त करणेची आवश्यकता आहे पावसाळ्याच्या मागील तीन महिन्यांपासून शेतकरी, शेतमजूर त्रस्त आहेत.औसा शहरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नालीतील गाळ काढून दुरूस्त करावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दि.२५ आॅगस्ट २०२० मंगळवार रोजी औसा नगरपालिकाचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांना निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात तालुका अध्यक्ष सुधाकर माळी,किशन कोलते, गोपाळ माळी,पप्पु मेह्त्रे, अशोक मेह्त्रे,श्रीमती मिनाबाई मेह्त्रे,अजीज मणियार,बिसेनी सर ,महालिंग फुटाणे,चनबस्प्पा केवळराम,पप्पु व्ही खुरपे आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या