कोकळगाव ग्रामपंचायत च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

 *कोकळगाव  ग्रामपंचायत च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*




 लातुर प्रतिनिधी;--

शनिवार दि.15 ऑगस्ट 

निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील ग्रामपंचायत च्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये 75%च्या पुढे विशेष प्राविण्य गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले.यावेळी कासार सिरसी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, अनिल कामले,तंटामुक्ती अध्यक्ष लालासाहेब शेख,उमेद अभियानाचे निलंगा तालुका प्रमुख संतोष पालके,गुरलिंग वाकडे, प्रा.डॉ.आयुब पठाण, प्रदीप गाडे,गणेश लामतुरे,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक संदीप तिप्पनबोने,वसंतराव मंजुळे, संदीप लामतुरे,पंडित माने,उमेद अभियानाच्या महिला बचतगटाच्या सी.आर.पी.सुवर्णा चाफेकर, आशा कार्यकर्त्या  चमाबाई सुर्यवंशी, यास्मिन शेख,आदींची उपस्थिती होती.  प्रथमतः कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना आदरांजली वाहण्यात आली.गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना  कासार सिरसी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे,मदनसुरी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा.डॉ.आयुब पठाण,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक संदीप तिप्पनबोने,गणेश लामतुरे, वसंतराव मंजुळे, सिद्धेश्वर लामतुरे,यांनी मार्गदर्शन केले.महिला बचत गटाच्या माध्यमातून उमेद अभियानाचे सी.सी. संतोष पालके यांनी जागर अस्मितेचा विषयी किशोरवयीन मुलींना व महिलांना जनजागृती केली.इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थी म्हणून बेदरे वैष्णवी रेवन,लामतुरे अश्विनी लिंबराज, बनसोडे राहुल विलास, माने विठ्ठल पंडित ,लामतुरे ऐश्वर्या बाळू,लामतुरे गायत्री जीवन,बनसोडे शितल विश्वनाथ , शिंदे पायल राम, पांचाळ प्रतीक्षा विश्वनाथ,पांचाळ कामिनी दिगंबर, कांबळे निखिल तर इयत्ता बारावी मध्ये 75 %च्या पुढे विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी बेदरे बद्रीनाथ रेवन,वाकडे अभिषेक बाबाराव,लड्डा मिथिला संजय ,मुरमे अंजली अंकुश, मुरमे मिनाक्षी लहू, पाटील निकिता दिगंबर आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या