उद्दिष्ट समोर ठेवुन अभ्यास केल्यास हमखास यश... प्रा.सुधीर पोतदार
मोमीन समाजातील गुणवंत विध्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी मार्गदर्शन
औसा=मुख्तार मणियार
-विध्यार्थ्यांनी कोणती ही शाखा निवडावी पण अभ्यासात तडजोड करु नका, यातच तुमचे यश दडलेले आहे.असे सांगुन स्पर्धा परिक्षा चे मार्गदर्शक प्रा.सुधीर पोतदार यानी सांगीतले की, आजचा काळ प्रत्येक क्षेत्रात स्पर्धेचा काळ आहे ,शिक्षण क्षेत्रात ही स्पर्धा वाढत आहे, अभ्यासातही स्पर्धा चालु आहे,जर या स्पर्धेत टिकायचे असेल तर ध्येय समोर ठेवुन अभ्यासात नियमितता व निरंतर वाचन हेच गरजेचे आहे.
औसा शहरातील मुस्लिम महेदवी समाजातील दहावी व बारावी बोर्ड परिक्षेत यश संपादन केलेल्या एकुण 34 विध्यार्थ्यांना " हज़रत मियाँ सय्यद खुंदमीर (रहे) मेमोरियल प्रमाणपत्र, स्मरण चिन्ह व लेखनी व पुष्पहाराने मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.एन जी लोहारे व प्रमुख पाहुणे म्हणुन समाजे ज्येष्ट अ.गनी करपुडे, प्रा.मक्बुल बरोटे, प्रा.अ.वहाब मल्लेभारी, कवी जिलानी मुल्ला , पत्रकार मुख्तार मणियार आदि उपस्थित होते.या वेळी प्रा. बरोटे यानी सांगीतले की, विध्यार्थ्यानी अभ्यासात लक्ष घालुन मिळालेल्या संधीचे सोने करावे. प्रा. मल्लेभारी यानी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की आपले यश हे समाजाचे यश आहे.तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे. संयोजक व सामाजिक कार्यकर्ते खुंदमिर मुल्ला यानी या कार्यक्रमाची भुमिका विषद केली, ते म्हणाले की समाजातील यश संपादन केलेल्या विध्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक मार्गदर्शन व प्रोत्साहन करण्यासाठी समाज बांधवांच्या मदतीने कार्यक्रमाचे आयोजन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध विधिज्ञ अॅड.एन जी लोहारे यानी आपले अनुभव व्यक्त करताना सांगीतले की,गरीबी शिक्षणात आडथडा जरुर आहे पण अभ्यासातील जिद्द, चिकाटी असेल तर आपण प्रत्येक आडथड्यास दुर करुन आपण अपेक्षित ध्येय प्राप्त करु शकतो. कार्यक्रमाचे संचालन म.आरेफ मन्यारी यानी विशिष्ट शैलीत केले तर आभार पत्रकार म.मुस्लिम कबीर यांनी मानले.
या वेळी समाजातील युवक, विध्यार्थी, व महिला, सामाजिक अंतर, मास्क, व सॅनिटायझर या नियमाचे पालन करुन उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.