गणपती बाप्पा समोर कोरोना जनजागृती आरास"

 " गणपती बाप्पा समोर कोरोना जनजागृती आरास"






( उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी   )

 नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार) यांच्या वतीने परंडा तालुक्यात कोरोना संसर्ग बाबत पोस्टर्स व स्टिकर्स लावून जनजागृती करण्यात आली आहे. तसेच सध्या घरोघरी गौरी गणपती स्थापना झाल्या आहेत. गणपती बाप्पा समोरील आरासातून कोरोना संसर्ग जनजागृती व फिट इंडिया या केंद्र सरकारच्या कार्यक्रमाची जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार)यांच्या वतीने कोरोना पार्श्वभूमीवर फिट इंडिया कार्यक्रम राबविला जात आहे. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक रणजीत महादेव पाटील यांनी कपिलापुरी येथे स्वगृही  हा अनोखा उपक्रम राबविला आहे. गणपतीचा उसत्वातून कोरोना संसर्ग  जनजागृती व फिट इंडिया कार्यक्रमाअंतर्गत कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीने किमान 30 मिनिटे योगक्रिया,शारीरिक कसरती,प्राणायाम,चालणे,पोहणे,

धावणे इ.करण्याचे आवाहन केले जात आहे. शारीरिक सदृढता, मनोधैर्य वाढविण्यासाठी,सुरळीत श्वसन क्रिया,

रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी याकरीता फिट इंडिया हा उपक्रम घेण्यात येत आहे.कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने या उपक्रमात सहभागी होऊन.घरीच हे उपक्रम करण्यात यावे असे आवाहन नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या कडून केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या