ग्रामिण रुग्णालय औसा येथे पी.पी.ई.किटचे वाटप

 ग्रामिण रुग्णालय औसा येथे पी.पी.ई.किटचे वाटप






औसा मुख्तार मणियार

औसा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते संगमेश्वर उटगे यांच्यामार्फत ग्रामिण रुग्णालय येथे आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स.व कर्मचारी यांच्या सुरक्षतेसाठी पी पी ई किटचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.औसा शहरासह तालुक्यात कोरोना बाधिंतांची संख्या वाढत असून आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांच्या सुरक्षतेसाठी पी पी ई किटचे वाटप करण्यात आले.यावेळीऔसा नगरपालिकाचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख,माजीनगराध्यक्ष जावेद शेख, नगरसेवक भरत सुर्यवंशी,गोंवीद जाधव,मुजाहेद शेख,साजीद काझी,अलीशेर कुरेशी अविनाश टिके,बळी पवार संगमेश्वर उटगे, गणेश सांळूके आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या