शेतकर्‍याच्या दुधाला अनुदान द्यावे भाजपाच्या वतीने निलंग्यात रास्तारोको आदोलन



शेतकर्‍याच्या दुधाला अनुदान द्यावे भाजपाच्या वतीने निलंग्यात रास्तारोको आदोलन
निलंगा :- राज्यातील शेतकरी सध्या अनेक संकंटानी ग्रस्त आहे. कधी शेतकर्‍यांना नापिकीला समोरे जात आहे तसेच कधी गारपिट ,कधी बोंगस बियाण्यामूळे दुबार पेरणीला सामोर जावे लागत आहे. त्यात सध्या दूध महासंघाकडून शेतीला पुरक असलेल्या दुध व्यवसायास सुध्दा आडचणी आणला आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या दुधाला योग्य भाव दिला जात नाही. यामूळे शासनाने शेतकर्‍यांच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये तर भूकटीला पन्नास रुपये प्रति किलो अनुदान द्यावे या करीता येथील उदगीर मोड येथे रास्ता रोको आदोलन करुन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा महाराष्ट्रात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत सापडलेला आहे. या अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळावा याकरीता दूध आंदोलन करून उदगीर मोड येथे निलंगा तालुका भाजपाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभाराचा समाचार घेत सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले असल्याचे सांगितले. विशेषतः सत्तेत आल्यानंतर शेतकर्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा करणार्या महाविकास आघाडी सरकारचे खरे रूप आता समोर आले आहे. शेतकर्यांना आणखी अडचणीत आणत कमी दराने दूध खरेदी केली जात आहे. दूध उत्पादक शेतकर्यांना न्याय मिळावा याकरीता सरसकट प्रतिलिटर  रुपये अनुदान मिळावे, दूध भुक्टी निर्यातीला प्रतिकिलो  रुपये अनुदान द्यावे आणि गायीच्या दुधाची खरेदी प्रतिलिटर  रुपये लिटर दराने करावी या प्रमुख मागण्या सरकारकडे केल्या होत्या. मात्र अद्यापही याबाबत सरकारकडून कोणताच निर्णय न झाल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे. असे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे यांनी सोगितले.
या आंदोलना वेळी नगराध्यक्ष बाळासोहब शिंगाडे, जि.प. उपाध्यक्ष भारताबाई सांळूके ,माजी जि प अध्यक्ष मिलिद लातूरे, माजी प स सभापती अजित माने, हरीभाऊ काळे, उपाध्यक्ष मनोज कोळ्ळे, तालकिध्यक्ष शहुराज थेटे, रिपाईचे अंकुश ढेरे,अशोक वाडीकर, कुमोद केशवराव लोभे, रविशंकर फुलारी, प्रमोद पाटील,सुमीत ईनानी, नागेश पाटील, बाळासाहेब पाटील, अशिष पाटील, प्रशांत पाटील, अविनाश बिराजदार, तम्मा गाडीबोने, तुकाराम माळी,सचिन पोदार, नागेंद्र पाटील, जि प सदस्य डॉ. संतोष वाघमारे, संजय हलगरकर, सुरेश बिराजदार, अदिसह जि.प.,प.स. व न.प.सदस्य उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या