जे.एस.पी.एम.लातूर संस्थेचा ब्रम्हदेव ठरला यशोशिखर गाठणारा “एकलव्य”


जे.एस.पी.एम.लातूर संस्थेचा ब्रम्हदेव ठरला यशोशिखर गाठणारा “एकलव्य”
कठोर परिश्रमाला यश ः दोन्ही हाताविना गाजविला गुणवत्तेचा लातूर पॅटर्न
लातूर ः 1/08/2020
दोन्ही हात नाहीत, तरीही शिकण्याची जिद्द असल्यामुळे ब्रम्हदेव लष्करे या तरूणाने चिकाटीच्या जोरावर कठोर परिश्रम व त्याला अभ्यासाची जोड देवून पदस्पर्शाच्या लेखणीने इयत्ता दहावीत त्यांने गुणवत्तेचे यशोशिखर गाठले. मुलगा अपंग असल्यामुळे तो कसा शिकणार?पुढे कसा जाणार?, अशी चिंता त्याच्या आई-वडीलांना होती. तरीही ब्रम्हदेवने इयत्ता दहावीत 66 टक्के गुण घेवुन आई-वडीलांना चकीत केले. दोन्ही हात नसतांना पदस्पर्शाच्या लेखनीने हा चमत्कार दाखविल्यामुळे ब्रम्हदेव लष्करेचा आदर्श इतर दिव्यांगासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
लातूर तालुक्यातील सिंकदरपुर येथील वडारवस्तीत ब्रम्हदेव लष्करे हा आपल्या आई-वडीलासमवेत राहतो.आई रामकाबाई तर वडील सुरेश हे दोघेही मिळेल ते काम करतात.अर्थिक परिस्थिती तशी हालाखिची त्यातच ब्रम्हदेव दोन्ही हातांनी अपंग असला तरी तो  शिक्षण घेवुन मोठा व्हॉवा अशी आई-वडीलांची मनोमन इच्छा..!परंतु ब्रम्हदेवालादोन्ही हात नाहीत, तो शाळा कसा शिकणार? हा प्रश्‍न लष्करे कुटुंबियासमोर होता. शिक्षकांनी पे्रेरणा दिली. आणि ब्रम्हदेवला  शिक्षणाची दिशा मिळाली. लातूर शहरातील मजगे नगर भागातील महाराष्ट्र विद्यालयात त्याने इयत्ता 9 वी व 10 वी शिक्षण पूर्ण केले. कठोर परिश्रम आणि अभ्यासाची जोड दिल्यामुळे इयत्ता  10 वी च्या बोर्ड परीक्षेतही 65.46 टक्के गुण घेवून तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. त्याच्या अंगातील जिद्द चिकाटी या गोष्टी लक्षात घेवून त्याला भविष्यातही दोन्ही हातावीना पदस्पर्शाने गुणवत्तेचे शिखर गाठता येणार हे मात्र निश्‍चित. हे त्याच्या एकंदर वाटचालीवरून समोर येत आहे.
पदस्पर्शाने गाठली गुणवत्तेची भरारी अटकेपार  
मी अपंग असल्यामुळे दिवसरात्र मिळेल ते काम करणार्‍या आई-वडीलांना सतत माझी चिंता होती. तरीही त्यांच्या चिंतेवर मात करीत मी जिद्देने शिकत राहिलो. जे.एस.पी.एम.चे संस्थाचालक माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मदतीने व मुख्याध्यापक गोविंद शिंदे, सहशिक्षक सुर्यकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 10 वी शिक्षण पूर्ण केले. आणि बोर्डाच्या परिक्षेत 66 टक्के गुण घेवून गुणवत्तेची पताका अटकेपार नेहली. मी अपंग असल्याने शिक्षक चव्हाण सर हे मला घरी येवून ज्ञानाचे धडे देत. त्यातही पायाने लिहीण्याचा सराव ही मोठी कसरत होती. परंतु आई-वडील शिक्षक आणि सातवीत असणारा भाऊ अमोल व बहीन पिंकी या सगळ्यांची प्रेरणा मिळाली. त्यामुळे भविष्यातही अशीच वाटचाल राहील असा विश्‍वासही ब्रम्हदेव लष्करे यांनी जननायकशी बोलताना व्यक्‍त केला.
जे.एस.पी.एम.लातूर संस्था मुलाला दत्तक घेणार
ब्रम्हदेव लष्करे हा वडार समाजातील मजूराचा मुलगा असून कठारे परिश्रमातून त्याने अपंगत्त्वावर व परिस्थिीवर मात करून 10 वी परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तेचे यशोदीप शिखर गाठले. अशा विद्यार्थ्यांला 11 वी, 12 वी शिक्षण पूर्ण करण्यासाठी जे.एस.पी.एम.लातूर ही शिक्षण संस्था दत्तक घेवून त्याच्या शैक्षणिक व इतर खर्च करून त्याला स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी जे.एस.पी.एम.संस्था मदत करेल, असा विश्‍वास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिला.
--------------------------------------------------
प्रति,
मा.संपादक/प्रतिनिधी
दैनिक ----------
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रकाशित करून सहकार्य करावे, ही विनंती.
     आपला
बाळासाहेब जाधव
जनसंपर्क अधिकारी
जे.एस.पी.एम./एम.एन.एस.बँक,लातूर
मो.9767625584



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या