शेतीपूरक व्यवसायाला शासनाने मदत केल्यासच शेतकरी सक्षम होईल
भाजपाचा दूध दर वाढीसाठी रास्तारोको ःमाजी आ.कव्हेकरांचे प्रतिपादन
लातूर दि.01/08/2020
शेतकर्यांचा शेती व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 20 जुलै रोजी दूधाला दरवाढ दूध पावडरला अनुदान देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावरून शासनाने 25 रू प्रतीलिटर भाव जाहीर केला. परंतु त्याचीही अंमलबजावणी राज्य शासनाकडून झालेली नाही. बाहेरच्या देशातून दूध पावडर मागविले असल्याची अफवा परसल्या जात आहेत. परंतु तशी पावडर अद्यापही आलेली नाही. तसेच कोरोनाच्या संकटात तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मदत करणे अपेक्षित होते. परंतु तशी मदतही अद्यापही राज्यसरकारने दिलेली नाही. गेल्या सहा महिण्यात शासनाने कुठलाही ठोस असा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आतातरी शासनाने शेतीपूरक व्यवसाय असणार्या दूधाला 10 रू अनुदान व गाईच्या दूधाला 30 रू दर, दूध पावडरला 50 रू अनुदान द्यावे, शेतीपूरक व्यवसायाला शासनाने मदत केल्यासह शेतकरी सक्षम होईल. असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते बाभळगाव नाका परिसरात भाजपा शहराच्यावतीने भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, यांच्या नेतृत्त्वाखाली दूध अनुदान व दरवाढ आंदोलन बाभळगाव नाका येथे करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्च्याच्या प्रदेश सरचिटणीस प्रेरणा होणराव, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना भाजपा नेते कव्हेकर म्हणाले की, आज आण्णाभाऊ साठे यांची जयंती भारत छोडो आंदोलनाच्या माध्यमातून इंग्रजांना आव्हान देणारे बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी याचे औचित्य साधून शेतकरी व दूध उत्पादकांच्या प्रश्नावर राज्यामध्ये दूध वाढीसंदर्भात एल्गार आंदोलन पूकारण्यात आले आहे. या माध्यमातून गायीच्या दूधाला प्रतिलिटर 30 रू भाव मिळावा व दूध भूकटीला प्रती किलोला 50 रू अनुदान मिळावे, अशी मागणी शासनाकडे केली आहे. केंद्र सरकारने कोरोनासंदर्भात 21 लाख कोटीची मदत देण्याचे काम केले आहे. यामध्ये भारत 5 व्या क्रमांकावर आहे. यामुळे शेती उद्योगाला मोठी मदत मिळालेली आहे. त्याच धर्तीवर शेतीमालाला भाव देण्यासाठी नवा वटहूकुम काढण्यात आलेला आहे. यामुळे शेेतीमध्ये आमुलाग्र बदल होणार असून यामुळे शेतकर्यांना नक्कीच न्याय मिळले, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनीही आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.यावेळी भाजपा संघटना सरचिटणीस मनिष बंडेवार, सरचिटणीस शिरीष कुलकर्णी, चिटणीस दिग्वीजय काथवटे, मिडीया सेल प्रमुख गोजमगुंडे, व्यंकट पन्हाळे, ललीत तोष्णिवाल, बसवेश्वर मंडल प्रमुख संजय गिर, नगरसेविका वर्षा कुलकर्णी, सरिता राजगिरे, शोभा पाटील, प्रविण अंबुलगेकर, प्रविण घोरपडे, मंगेश बिराजदार, ज्योतीराम चिवडे, बाळासाहेब शिंदे, श्रीराम कुलकर्णी, प्रविण सावंत, नरेश पंड्या, नागोराव बोरगावकर, रवि सुडे, राजा माने, सुजित नाईक, गणेश गवारे, विजय अवचारे, देवा गुंडरे, परमेश्वर महाडूळे, मुन्ना हाश्मी, राजाभाऊ मुळे, बाबासाहेब देशमुख, महादेव गायकवाड, अनिल पाटील रायवाडीकर यांच्यासह भाजपा, भाजपा युवा मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकत्यार्ंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
-----------------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.