आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कमी झालेल्या दूध दराच्या प्रश्नासाठी मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांसह


आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कमी झालेल्या दूध दराच्या प्रश्नासाठी मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांसह गायींना घेऊन सरकारचा निषेध व्यक्त करत निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.यापूर्वी सरकारला मनसे तर्फे तसेच शेतकरी संघटनेतर्फे अनेक वेळा निवेदन देऊन दुधाला प्रतिलीटर 10 रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती परंतु निवेदनाची भाषा सरकारला कळत नसल्याने  गोमाते चे तरी मनोगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळेल म्हणून गोमातेचे मनोगत पत्राद्वारे मुख्यमंत्रांना देण्यात आले.यावेळी गायीच्या शिंगाना निषेधाच्या काळ्या पट्ट्या बांधून तसेच गाईच्या गळ्यात सरकारच्या  निषेधाचा फलक लावून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला व मनसेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. 
यावेळी गाईचे मुख्यमंत्री यांना अश्या प्रकारे पत्र देण्यात आले 

*"गाईचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले पत्र"* 
        *"साहेब दुधाचे भाव वाढवा आणि मला माझ्या मालकाला तसेच माझ्या असंख्य भगिनींना वाचवा"*
       आदरणीय मुख्यमंत्री साहेब,सप्रेम नमस्कार 🙏पत्रास कारण की सध्या मी,माझ्या असंख्य भगिनी,माझे व माझ्या भगिनींचे पालक आम्ही सर्वचजण खूप दुःखात आहोत.साहेब, मी मूक जनावर पण मला माझा मालक असलेला शेतकरी राजा पोटच्या लेकराप्रमानं जिवापाड संभाळतो त्यामुळे मला माझ्या मालकाचा मायेचा स्पर्श त्यांचा उतरलेला चेहरा पाहून त्याच्या हृदयात साचलेले दुःख त्याने माझ्यासमोर न बोलता व बोलून व्यक्त केलेल्या सर्व भावना मला समजतात,माझा मालक गेल्या चार पाच वर्षात सततच्या दुष्काळामुळे तसेच दुबार पेरणीचे संकट शेती मालाला भाव नाही पीक कर्ज मिळत नाही अशा अनेक संकटांचा सामना करत पुरता खंगुण गेलाय.
    👉  *तरीही अशा बिकट परिस्थितीतही त्यानं स्वतः अनेक वेळा उपाशी राहून प्रसंगी कर्ज काढून मला चारा पाणी कमी पडू न देता माझा सांभाळ केलाय.त्याने माझ्यासाठी स्वतःला घर नसतानाही पैसे खर्चून छान गोठा बांधलाय त्याने दुष्काळात त्याच्याजवळ चारा उपलब्ध नसतानाही अव्वाच्या सव्वा भावाने चारा खरेदी करून मला जगवलय त्यामुळे त्याचे हे माझ्यावरील अनंत उपकार मी कसे फेडू असा विचार नेहमी माझ्या मनात येतो.* 
    अशातच आज तो माझ्याजवळ आला व माझ्या पाठीवरून हात फिरवत ओक्साबोक्शी रडू लागला व रडत रडत म्हणू लागला दुधाला भाव मिळत नाही,पेंडीचे चाऱ्याचे भाव वाढलेत दुधाचे पैसे महिना महिना मिळायला तयार नाहीत,दुधाचा धंदा पाच सहा महिन्यांपासून तोट्यात चाललाय याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही,अशा परिस्थितीत मी तुला खूप ताकद लावून सांभाळले पण आता माझ्याजवळ काहीच उरले नाही त्यामुळे मला आता तुला विकल्याशिवाय मार्ग नाही,*याच कारणामुळे माझ्या बलवडी भाळवणी जि सांगली येथील वसंत पवार या भावान त्याच्या दावणीच्या 34 गायी विकल्यात आता माझ्यासमोरही दुसरा पर्याय नाही असे  रडत रडत म्हणू लागला त्याचे अतीव दुःखाने रडणे पाहून माझ्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले शेवटी रडून रडून तो माझ्यापासून घराकडे निघून गेला आणि मग माझ्या मनात विचारांचे चक्र सुरू झाले की *ज्या मालकाने मला एवढे जीव लावून सांभाळले तो संकटात असताना त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून मी काय करू 'काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा' असा मी विचार करू लागले* आणि मग विचार करून करून ठरवले की दुसऱ्या कोणाला माझे व मालकाचे दुःख सांगण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार हाकणाऱ्या कारभाऱ्यालाच सांगावे म्हणून शेवटचा इलाज म्हणून तुम्हाला हे पत्र लिहीत आहे पत्रात माझ्या मालकाने माझ्यासमोर त्याच्या मित्राला या प्रश्नासंदर्भात ज्या भावना व्यक्त केल्या त्या मी आपल्याला लिहीत आहे माझा मालक त्याच्या मित्राला म्हणत होता *सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने लग्न,समारंभ,सामाजिक उपक्रम,हॉटेल्स,स्वीटमार्ट्स, पनीर आईस्क्रीम असे सर्वकाही बंद आहे* त्यामुळे दुधाचे दर लिटरमागे 10 ते 15 रुपयांनी कमी झालेले आहेत तसेच दुधाचे पेमेंटही महिना महिना मिळायला तयार नाही त्यातच *चीन युरोप आफ्रिका या देशात आपल्याकडून होणारी दूध पावडर ची निर्यात बंद आहे त्यामुळे देशात दीढ लाख टन दूध पावडर शिल्लक आहे तर राज्यात 50 हजार टन दूध पावडर शिल्लक आहे या सर्व बाबींमुळे दूध पावडरचा दर 330 रुपयांवरून 180 रुपयांवर आला आहे त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडेपर्यंत सरकारने दुधाला लिटरमागे 10 रुपयाचे अनुदान दिले पाहिजे दूध पावडरला निर्यातीसाठी परवानगी दिली पाहिजे तसेच सध्या दूध पावडरला प्रतिकिलो 50 रु अनुदान मिळाले पाहिजे दूध पावडर बटर तूप यावरील GST कमी केली पाहिजे केंद्र सरकारने 30 हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक केला पाहिजे व या परिस्थितीतून बाहेर पडल्यास दूध दराची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासनाने दूध उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत दूध पोहचेपर्यंत फक्त प्रक्रिया खर्च म्हणून दूध दरात लिटरमागे जी 20 ते 30 रुपयांची वाढ होते ती कमी करून शासनाने दूध उत्पादकांनाच जास्तीचा नफा मिळण्यासाठी  दुधाला उत्पादन खर्च अधिक 50 % नफा याप्रमाणे हमीभाव दिला पाहिजे असे माझा मालक त्याच्या मित्राला म्हणत होता*
       हे त्याचे म्हणणे मी आपल्यासमोर पत्ररुपाने सादर करत आहे यावर आपण गांभीर्याने विचार करावा व या संकटातून मला माझ्या मालकाला व माझ्या असंख्य भगिनींना वाचवावे ही नम्र विनंती  😢
           *आपली*
*"एक सर्वांसाठी उपयुक्त गाय"*

या आंदोलनात मनसे शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे,भागवत शिंदे,रवी सूर्यवंशी,किरण चव्हाण,बाळासाहेब मुंडे,भागवत कांदे,चेतन चौहान,सूर्यकांत गालफाडे,दौलत मुंडे,प्रमोद कांदे,शिवराज सिरसाट,शहाजी केंद्रे,आबाजी डाके,दीपक कांदे,नाथराव आंबेकर, एकनाथ कांदे,मनोहर लटपटे,बालाजी कांदे,सदाशिव आंबेकर,शहेनशहा सय्यद,बालाजी हानवते,चंदू केंद्रे,राजू गोरे,अविनाश वाघमारे,असद शेख,असिफ शेख,बिभीषण जाधव,दीपक कांबळे,माधव घुले,सुलतान शेख,संजीव कांदे,भास्कर घुले,संभाजी भताने,दत्ता थोरमोटे, भरत संपते,विश्वास शिंदे,बळी सिरसाट, विश्वजीत राणा,श्री कस्पटे, विशाल भिसे आदी कार्यकर्ते उपस्थीत होते


--
Photo By- Narayan Pawle


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या