लातूरात साकारला वृक्षरुपी गणपती १००० रोपांचे मोफत वाटप

 

लातूरात साकारला वृक्षरुपी गणपती
१००० रोपांचे मोफत वाटप
*मी दगडात नाही*
*मी देवळात नाही*
*मी निसर्गात आहे*
*असे सांगणारा पर्यावरणपुरक गणपती*
*श्रीगणेश ऑफ*
 🌳 *ग्रीन लातूर वृक्ष टिम* 🌳

.




श्रीगणेशाची नानाविध रुपे सर्वांना मोहीत करत असतात. श्रीचे असेच एक मोहक आणि पर्यावरणाचा संदेश देणारे रुप ग्रीन लातूर वृक्ष टिम तर्फे साकारण्यात आलेले आहे.  
दयानंद गेट, बार्शी रोड परीसरातील एका झाडाला श्रीगणेशाचे मोहक रुप देउन त्याची पुजा करण्यात आली.  
पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचे रक्षण झाले तरच जीवसृष्टी संरक्षण होईल. झाडे लावा झाडांचे संगोपन करा, झाडांमध्येच आपला देव शोधा हा संदेश देण्याकरीता ग्रीन लातूर वृक्ष टिम वृक्षरुपी गणेशोत्सव साजरा करत आहे.
या गणेशोत्सवाच्या काळात चिंच, करंज,बांबू, सिताफळ यांच्या १००० रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.  
उपक्रमाकरीता ग्रीन लातूरवृक्ष टिमचे  डॉ. पवन लड्डा, मनपा नगरसेवक इम्रानजी सय्यद, प्रमोद निपानीकर, रुषिकेश दरेकर, ॲड. वैशालीताई लोंढे यादव, हितेश डागा, पुजा निचळे, चैतन्य प्रयाग, रणजीपटू आशिष सुर्यवंशी, गंगाधर पवार, सुलेखा कारेपुरकर, सार्थक शिंदे, शैलेश सुर्यवंशी, कल्पना फरकांडे, महेश गिल्डा यांनी परिश्रम घेतले. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षणाला हातभार लागेल असे मत सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वैशाली लोंढे यादव यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या