कै . देविदासराव जमदाडे प्रबोधन व विचार मंचच्या वतीने आयोजित
------------------------------ ------------------------------ -------------------
देशभक्तीपर राज्यस्तरीय काव्यलेखन
स्पर्धेचा निकाल घोषित : डॉ. संजय जमदाडे
लातूर, दि. २२ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील कै . एड.
देविदासराव जमदाडे प्रबोधन व विचार मंचच्या वतीने आयोजित करण्यात
आलेल्या देशभक्तीपर राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात
आला असल्याची माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक डॉ. संजय जमदाडे यांनी दिली.
भारत माता, तिरंगा आणि सैनिक हे तीन शब्द उच्चारले की प्रत्येक
भारतीयाच्या मनात एक दिव्य महाशक्ती संचारते. ,१५ ऑगस्ट आपला
स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्य दिनानिमित्त या उत्साहाला पारावर उरत नाही.
नव्या आणि जुन्या पिढीच्या मनात या स्वातंत्र्याबद्दल काय भावना आहेत हे
जाणून घेण्याचे काम कै. एड. देविदासराव जमदाडे प्रबोधन व विचार मंच,
लातूर द्वारा एक उदात्त भावना ठेवून या देशभक्तीपर राज्यस्तरीय काव्यलेखन
स्पर्धेच्या निमित्ताने केले आहे. वर्तमान व्यस्त संस्कृतीतील कवींना
लिहिते करावे आणि त्यामधून मानवी जीवन समृध्द करावे, हा यामागचा प्रयत्न
होता . स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच कवींच्या कविता वाचनीय अन्
आशयघन आहेत. त्यातील देशभक्ती आणि वर्तमान समाजजीवनाचा घेतलेला वेध
जिवंतपणे साकारलेला आहे.लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच भावणा-या
आहेत.
या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत प्रथम निलेश पा-हाटे (पुणे) यांनी
प्रथम क्रमांक पटकावला आहे. , द्वितीय डॉ. सुजाता मराठे (मुंबई), तृतीय
सतीश खरात (वाशिम), तृतीय माधुरी पंडित(कोल्हापूर) यांनी तर उत्तेजनार्थ
दीपिका क्षीरसागर (मेळघाट) व प्रकाश जिंदे (वर्धा) या कवींनी यश संपादन
केले. या काव्यलेखन स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. व्यंकटी पावडे (नांदेड),
प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण (वसमत), कवी डॉ. संजय जमदाडे यांनी केले. सर्व
यशस्वी कवींचे व सहभागी कवींचे मंचचे अध्यक्ष डॉ. संतोष जमदाडे, मुख्य
संयोजक डॉ.संजय जमदाडे व संयोजक प्रा.डॉ.कमलाकर चव्हाण यांनी अभिनंदन
केले आहे.
--------------------------
------------------------------

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.