वृक्षारोपण करत मुलीचा द्वितीय वाढदिवस साजरा
शिक्षक-ग्रामसेवक दाम्पत्याचा अनोखा उपक्रम
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील गुळखेडा या गावचे भूमिपुत्र असणारे शिक्षक अनिल सोनकांबळे व त्यांची पत्नी ग्रामसेविका पूनम घाडगे यांनी आपल्या मुली च्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करत निसर्ग संवर्धन करण्याचे महत्व ओळखून वृक्ष लागवड करून एक चांगला संदेश दिला आहे. ते सध्या लातूरच्या विकासनगर परिसरात राहत असून येथील शिक्षक अनिल सोनकांबळे आणि ग्रामसेविका पूनम घाडगे यांनी समाजासमोर एक आदर्श घालून दिला आहे. सोनकांबळे या दाम्पत्याने शुक्रवारी आपल्या प्रियल नामक मुलीचा द्वितीय वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा केला.
वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यांनी अनेक चाफ्यांची झाडे लावून स्तुत्य उपक्रम केला. यावेळी शिवाजी कांबळे, खंडेराव बिडवे, फोर्स फिजिक्स अकादमीचे संचालक जयपाल सर, ग्रामसेवक जयभीम कांबळे, माजी पोलिस दशरथ घाडगे, मिलिंद सोनकांबळे, अमोल गवळी, प्रशांत रोडे, पल्लवी घाडगे, शासकीय रुग्नालयातील परिचारिका शीतल वाव्हळकर, शिक्षक नेते तथा मुख्याध्यापक विजयकुमार पिनाटे, किरण केवडे, सामाधान शेळके आणि बालाजी उपाडे आदींची उपस्थिती होती. द्वितीय वाढदिवसानिमित्त प्रियल उर्फ परी हिस सर्वानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.