बेशिस्त वाहनांचा पार्किंग मुळे रहदारीला अडथळा
औसा मुख्तार मणियार
औसा शहरातील मुख्य चौक,बस्थानक परिसर, प्रमुख मार्ग बाजारपेठेत वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे.कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर जाहिर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये काहिशी शिथिलता देण्यात आली आहे त्यानुसार औसा शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.बेशिस्त वाहनांचा वावर वाढल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग केली जात आहे.आता टप्पाटप्याने बाजारपेठ सुरू होत असल्याने खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी होत आहे.मात्र फिजिकल डिस्टन्साचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे अद्याप शाळा, महाविद्यालय बंद आहेत.अशा स्थितीत अतिक्रमणे हटवून वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे.बेशिस्त वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी त्रस्त झालेल्या औसेकरांतून होत आहे.यावेळी औसा शहरातील वेगवेगळ्या मार्गावर आणि प्रमुख बाजारपेठेत बेशिस्त वाहने आढळून येत आहेत.त्यांची पार्किंगही बेशिस्त सुरु आहे.याबाबत नागरिकांनी तक्रार करावी, कारवाई केली जाईल असे औशाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी सांगितले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.