नगर परिषद कर्मचा-यांचा एक दिवसीय नियोजित संप मागे

 नगर परिषद कर्मचा-यांचा एक दिवसीय नियोजित संप मागे

ओसा मुख्तार मणियार

राज्यभरातील नगरपरिषद/नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी कर्मचारी संघटनेच्या वतीने दि.११ आॅगस्ट २०२०मंगळवार रोजी एक दिवसीय कामकाज बंद आंदोलन पुकारण्यात आले होते.नगरपरिषद क्षेत्रातील अधिकारी- कर्मचा-यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने कर्मचारी अडचणीत होते म्हणून संघटनेने दि.११ जुलै २०२० रोजी प्रशासनाला एक दिवसाचे कामकाज बंद आंदोलन करुन संप करण्याचा निर्णय घेतला होता.तथापी नगरपरिषद/नगर पंचायत आस्थापना व संवर्ग कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांवर नगर परिषद प्रशासन संचनालय मार्फत कार्यवाही सुरू आहे.तसेच सध्या चालू असलेल्या लोळव-१९ मुळे उध्दभवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीत नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेले दि.११ आॅगस्ट २०२० रोजी कामबंद आंदोलन मागे घ्यावे असे पत्र कल्पिता पिंगळे संचालक नगर परिषद प्रशासन संचनालय मुंबई यांनी दि.१० आॅगस्ट २०२० रोजी आयुक्त तथा संचालक नगर परिषद संचनालय यांचे आदेश काढले असल्याने नगर परिषद कर्मचा-यांच्या नियोजित संप मागे घेण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या