माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या
निधनामुळे महाराष्ट्राचा विकासपुरूष गमावला
भावपूर्ण श्रंध्दांजली ः माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे मत
निधनामुळे महाराष्ट्राचा विकासपुरूष गमावला
भावपूर्ण श्रंध्दांजली ः माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे मत
लातूर दि.06/08/2020
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य सेनानी मा.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे अचानक निधन झाल्यामुळे महाराष्ट्रातील कुशल संघटक, चारित्र्यसंपन्न, विकासाची दृष्टी असणारे व कार्यकर्ता व सहकार्याला आपल्या कुटुंबासारखे वागविणारे, महाराष्ट्राचे विकासपुरूष गमावले असल्याची भावना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केली.
यावेळी ते जे.एस.पी.एम.संस्थेच्यावतीने स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित भावपूर्ण श्रध्दांजली कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संस्थेचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, समन्वयक बापूसाहेब गोरे, प्राचार्य सच्चिदानंद जोशी, जगपाल काळे, मोहन खुरदळे, राजकुमार साखरे, कॅम्पस प्रमुख चंद्रशेखर पाटील, सौ.आशा जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, निलंगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 40 वर्षे आम्ही विविध क्षेत्रात कार्य केलेले आहे. त्यांचे प्रेम व विश्वास सातत्याने लाभत असे, ते मुलाप्रमाणे मला वागवत असत. त्यांच्या अचानक जाण्याचे आम्हा सर्वांची व राज्याची मोठी हानी झाली असल्याचे सांगून. या महान मानवाच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी बोलताना केली.
प्रांरभी जे.एस.पी.एम.संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच दोन मिनिट स्तब्ध राहून संस्थेच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जे.एस.पी.एम.संस्थेचे संपत जाधव, मनोज गायकवाड,पी.जे.मोरे,परमेश्वर स्वामी, जगदीश सोमवंशी, सुनिल आदमिले, शेख सर, आकाश जाधव, रवी जगदाळे, बाळासाहेब जाधव, गोपाळ खोंडे, सादीक शेख यांच्यासह कर्मचार्यांची उपस्थिती होती.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.