लातूर जिल्ह्यातील घोषित केलेले कडक लॉकडाऊन मागे घ्या: अभिमन्यु पवार यांची मागणी




लातूर जिल्ह्यातील घोषित केलेले कडक लॉकडाऊन मागे घ्या: अभिमन्यु पवार यांची मागणी




औसा मुख्तार मणियार
लातूर शहर व जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी दि.५ आगस्ट २०२० बुधवार रोजी लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनात त्यांनी लातूर शहर व परिसरातील अनेक गावांत दि.१५ आगस्ट पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने लातूर शहरातील व्यापारी व जनतेत तिवर नाराजी व असंतोष निर्माण झाला आहे.मार्च २०२० पासून आजतागायत व्यवसाय, उद्योग धंदे बंद असल्यामुळे लहान व मोठे व्यापारी व हातावर पोट असलेल्या व्यावसायीक, आर्थिक व मानसिक तणावात जगत असुन दैनंदिन गरजा भागविण्याचा,जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने लातूर जिल्ह्यातील सर्व उद्योग धंदे सुरू करण्याची मागणी लातूर व्यापारी महासंघाने पत्राद्वारे केली आहे.
राज्य शासनाने मुंबई, पुणे येथील लॉकडाऊन शिथिल करून उद्योग धंदे सुरू केली आहेत.त्याच धर्तीवर लातूर जिल्ह्यातील घोषित केलेले कडक लॉकडाऊन मागे घेण्यात यावे,व मुंबई पुणेच्या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय शासनाच्या नियमानुसार पालन करण्याच्या अटीवर सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री अमित देशमुख यांना अभिमन्यु पवार यांनी केली आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या