औसा शहरातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था

 औसा शहरातील मुख्य रस्त्याची दैन्यावस्था





औसा मुख्तार मणियार

औसा शहरात १३ अॉगस्ट पासून सततच्या भीज पावसामुळे जनजीवन संपूर्णता विस्कळीत झाले असून भीज पावसामुळे औसा शहराला दलदलीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.४० ते ५० हजार लोकसंख्येच्या औसा शहरातील मुख्य रस्त्याची दैन्यावस्था झाली असून नगरपालिकेच्या दुर्लक्ष पणामुळे व्यापारी आणि ग्राहकांसह, नागरिक,वृध्द महिला व लहान मुलांचे आतोनात हाल होत आहेत.औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या तिसरा टप्प्यांचे रस्ता रुंदीकरणाचे अनेक दिवसांपासून रखडले आहे, शहराच्या ऐन प्रवेशद्वाराजवळ लातूर वेस हनुमान मंदिर ते जामा मस्जिद पर्यंत मुख्य रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचले आहे.येणा-या-जाणा-या वाहनामुळे पायी चालणाऱ्याच्या अंगावर शिंतोडे उडत असून भीज पावसामुळे रस्त्यावर चिखल,गाळ यामुळे दलदल निर्माण झाली आहे.मागील सहा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून औसा शहरातील मुख्य रस्त्यासह गल्लीबोळातही दलदल निर्माण झाली आहे.सततच्या पावसामुळे दलदल झालीय असून डासांचे प्रमाण वाढले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या