बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन


बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन 
रोजगार मेळाव्याचे आयोजन




लातूर,दि.6(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर यांच्या मार्फत  पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा 14 ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार असून नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्धतेसाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने मेळावा महत्वाचा आहे. मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्स तसेच मोबाईल किंवा दूरध्वनीव्दारे घेण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून अनेक औद्योगिक आस्थापना, व्यवसाय व उद्योग बंद होते. आता शासनाने काही अटी व शर्तीच्या अधिन राहून कंपन्या, औद्योगिक आस्थापना सुरु करण्यास मान्यता दिली आहे. आस्थापनांना मनुष्यबळाची आणि बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता आहे.
इच्छुकांसाठी या जागा रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्यांकडील 300 रिक्तपदे (Dioloma Apprentice, CNC Operator, Welder, Turner, Quality Inspector, Semi Skilled Workmen ) अधिसूचित करण्यात आलेली आहेत. (सदरच्या पदामध्ये वाढ होवू शकते.) कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी ऑनलाईन पध्दतीने तसेच मोबाईल, दूरध्वनीव्दारे पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन विविध पदांसाठी रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करणसाठी उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन online job fair Latur-2 या मध्ये जाऊन 10 वी 12 वी पदवीधर तसेच इतर पात्रताधारक उमेदवारांनी आपल्या पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध्‍ रिक्त पदांसाठी अर्ज करुन जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन प्र. सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                       ****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या