मुरलीधर शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक
हा प्रवास प्रेरणादायी
- अमित देशमुख
लातूर (प्रतिनिधी) ६ जुलै २० :
पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाचे वृत्त दु:खद असून वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजता आणि वाचता येणारे वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. १९९४ मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक/ संस्थापक हा प्रवास थक्क करणारा असून त्यांनी या क्षेत्रात केलेले काम कायम स्मरणात राहील.
----------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.