कोविड१९ प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लातूर शहरात प्रभाग निहाय रॅपिड अँटीजन तपासणी केंद्र आणि कोविड केअर सेंटर उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न नगरसेवकांसोबतच्या झूमॲप वरील बैठकीदरम्यान पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडून आश्वासन


कोविड१९ प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लातूर शहरात प्रभाग निहाय रॅपिड अँटीजन तपासणी केंद्र आणि कोविड केअर सेंटर उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न

नगरसेवकांसोबतच्या झूमॲप वरील बैठकीदरम्यान

 पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडून आश्वासन






लातूर (प्रतिनिधी) ६ जुलै २० :


    लातूर शहरातील कोविड१९ चा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात रॅपिड ॲटीजेन तपासणी केंद्र आणि तेथेच बाजूला छोटेखानी कोविड केअर सेंटर उभारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करून तसे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात येतील असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी नगरसेवकां सोबतच्या झूम ॲपवरील बैठकी दरम्यान दिले आहे.

  पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवारी लातूर शहरातील काही नगरसेवकांची पहिल्या टप्प्यात झूम ॲपच्या माध्यमातून एकत्रित संपर्क साधला. शहरातील कोविड प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाय योजनाबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली, उपाय योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटीवर चर्चा करून त्या त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने सूचनाही केल्या आहेत. सर्व नगरसेवकांचे म्हणणे आणि सूचना ऐकून घेतल्यानंतर शहरातील कोविड१९ प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभागनिहाय रॅपिड अँटिजेंन टेस्ट सेंटर आणि कोविड केअर सेंटर उभारणे गरजेचे असल्याचे नमूद केले. संबंधित यंत्रणेला तातडीने तशा सूचना देण्यात येतील असे आश्वासन पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिले. नगरसेवकांनी त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करून सादर करावेत, शिवाय ही प्रक्रिया व्यवस्थित चालवण्यासाठी सक्रिय राहून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

लेबर कॉलनी येथील स्त्री रुग्णालयाच्या ठिकाणी 100 बेडचे कोविड डेडिकेटेड रुग्णालय सुरू करण्याची सूचनाही त्यांनी मान्य केली कोविड१९ चा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे परंतु त्यात थोडी शिथिलता आणावी अशी सूचना कांही नगरसेवकांनी यावेळी मांडली, जीवनदायी योजना लागू असलेल्या खाजगी  हॉस्पिटलची माहिती सामान्य माणसाला कळण्यासाठी शहरात ठिकाणी मोठे फलक लावण्यात यावेत, लहान व मध्यम व्यवसायिकांनी घेतलेल्या कर्जावरील दंड आणि व्याज माफ करण्यासाठी  संबंधित बँक व संस्थाना सूचना कराव्यात अशी मागणीही यावेळी  काही नगरसेवकांच्या वतीने करण्यात आली. नगरसेवकांनी यावेळी मांडलेल्या सर्व सूचना योग्य असून त्यावर अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले जातील असे आश्वासन पालकमंत्री ना. देशमुख यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री सोबतच्या कोवीड१९ अनुषंगाने नगरसेवकांच्या पहिल्या टप्प्याची या बैठकीत    लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या सोबत झालेल्या दूरदृश्य माध्यमादवारे आढावा बैठकीस लातूर महानगरपालीका माजी स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर, नगरसेवक रवीशंकर जाधव, कैलास कांबळे, सचिन बंडडापल्ले, इम्रान सय्यद, विजयकुमार साबदे, ओमप्रकाश पडीले, सपना किसवे, बासले रेहाना, गौरव काथवटे, पुजा पंचाक्षरी, दिप्ती खंडागळे, कांचन अजनीकर, युनुस मोमीन, मिना लोखंडे, आयुब मणीयार, बाळासाहेब देशमुख, विकास वाघमारे उपस्थित होते. 

------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या