औसा शहराला चाळीस दिवसाआड पाणीपुरवठा तावरजा प्रकल्प अद्याप कोरडाच

 औसा शहराला चाळीस दिवसाआड पाणीपुरवठा  तावरजा प्रकल्प अद्याप कोरडाच







औसा मुख्तार मणियार

निम्मा पावसाळा संपुष्टात आला असला तरी तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही.परिणामी,शहराला पाणी पुरवठा करणारा तावरजा प्रकल्प अद्याप कोरडाच आहे.परिणामी शहरवासीयांना तब्बल चाळीस दिवसांपासून पाणी पुरवठयात अनियमितता असल्याने नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.औसा शहराची लोकसंख्या ५० हजारांपेक्षा जास्त आहे शहराचा पाणी पुरवठयाची भिस्त तावरजा प्रकल्पावर अवलंबून आहे. तालुक्यात अता पर्यंत मुसळधार पाऊस झाला नसल्याने प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली नाही परिणामी नळाला चाळीस दिवसांतून एकदा पाणी येत आहे.शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.७५० लिटर्ससाठी १५० रुपये मोजावे लागत आहेत.प्रकल्पातील बुडक्या, बोअरवेल वर कसेबसे दिवस निघत असले तरी सक्षम व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी होत आहे.पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले आहेत.अद्याप प्रकल्पात पाणी साठा झाला नाही बुडकीवर चाळीस दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.आगामी काळात पाऊस पडेल, त्यामुळे अडचण भासणार नाही असे नगरपालिकाचे पाणी पुरवठा सभापती गोंवीद जाधव यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या