उजनीत येथे एका रात्रीतून चार दुकाने फोडली
औसा मुख्तार मणियार
औसा तालुक्यातील उजनी येथील मोडवरील चार दुकाने चोरानी फोडून एक लाख ३४ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दि.१३ २०२० गुरुवार रोजी सकाळी उघडकीस आली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ येथून राधानगर भागाकडे जाणा-या रस्त्याच्या कडेचे एक महाराष्ट्र मेडिकल,श्री.कलेक्शन,तुळजाई मोबाईल्स व कोहीनूर बारचे बुधवारी दि १२अॉगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास लोखंडी शटर वाकवून चोरी झाल्याचे उघडकीस आले.यामध्ये महाराष्ट्र मेडिकल मधील एक लाख पांच हजार रुपये,श्री.कलेक्शनच्या कापड दुकानातील १५ हजार रुपये,तुळजाई मोबाईल दुकानातील ५ हजार रुपये नऊशे रुपयांचे मोबाईल व उपकरणे आणि कोहीनूर बारमधील आठ हजार सहाशे रुपयांची विदेशी दारू असा एकूण एक लाख ३४ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.याबाबत भादा पोलिस ठाण्यामध्ये अनोळखी चोराविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.तपास पोलिस निरीक्षक श्री मुळीक करीत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.