औशात कोरोनातुन मुक्त होऊन आलेल्या व्यक्तींचे स्वागत

 औशात कोरोनातुन मुक्त होऊन आलेल्या व्यक्तींचे स्वागत



औसा मुख्तार मणियार

औसा शहरातील भीम नगर येथे राहणारे वार्ड क्रमांक एक मधील नगरसेवक अंगद कांबळे  यांना दि १३ अॉगस्ट गुरुवार रोजी कोरोनातुन मुक्त होऊन  घरी परत आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य, गल्लीतील, परिसरातील नागरिकांनी, त्यांचा उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.यावेळी अंगद कांबळे म्हणाले, काही दिवसांपूर्वी मला निमोनियाचे इन्फेक्शन  झाले म्हणून सोलापूर येथील रूग्णालयात दाखल झालो तेथे माझी कोरोनाची चाचणी ही झाली व ती पॉझिटिव्ह आली त्यावर उपचार घेतल्यानंतर कोरोना मुक्त झाल्यामुळे .दिनांक  १३अॉगस्ट गुरुवार रोजी मला घरी पाठविण्यात आले.हे होऊ शकले ते फक्त आपल्या सर्वांचे प्रेम, आशिर्वादाने आणि सदिच्छा सदैव माझ्या पाठीशी असल्याने या काळात सर्वांनी काळजीपोटी मला फोन, मॅसेज, सोशल मिडियाद्वारे विचार पूस केली हा खरच खूप मोठा आधार होता याबद्दल मी आपल्या सर्वांचा कायम रूणी राहीन याच आपल्या प्रेम आशिर्वाद व सदिच्छाच्या जोरावर मी पुन्हा जनसेवेसाठी सज्ज झालो आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले.

.कोरोनातुन मुक्त होऊन आलेले नगरसेवक अंगद कांबळे यांचे त्यांच्या कुटुंबातील गल्लीतील परिसरातील लोकांनी त्यांना कार मध्ये बसवून, फुले उधळुन,व फटाके वाजवून जंगी स्वागत केले.या अनोख्या स्वागतास या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या