मोठ्या गावातील सिंचन विहिरींची मर्यादा २० पर्यंत वाढवली.
-- मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली माहिती.
【व्यंकटराव पनाळे, मुक्त पत्रकार】
★ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींची मर्यादा ५ वरून २० पर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. हि माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एका ग्रामपंचायतमध्ये एका वेळी ५ सिंचन विहीरी मंजूर करता येतील, अशी मर्यादा यापूर्वी घालून देण्यात आलेली होती. सिंचन विहिरींच्या कामांची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे ही मर्यादा वाढवून मिळावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून मंत्री संदिपान भुमरे यांनी ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सिंचन विहिरीची मर्यादा वाढवून देण्यास मंजुरी दिली आहे. ग्रामपंचायतींच्या लोकसंख्यानुसार विहिरी देण्यात येणार आहेत.
१५०० पर्यंत असेल तर ५
१५०१ ते ३००० पर्यंत १०
३००१ ते ५००० पर्यंत १५
५००१ चे वरील लोकसंख्या असेल तर २० विहिरींची संख्या असणार आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन विहिरींचा लाभ मिळणार आहे व शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडून आर्थिक उन्नती होणार असल्याने सदरील निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत.
- व्यंकटराव पनाळे मुक्त पत्रकार
९४२२०७२९४८
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.