कै.हणमंत सदाशिव कसबे यांच्या स्मरणार्थ औसा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
औसा मुख्तार मणियार
औसा येथील नगर परिषदेचे वरीष्ठ लिपिक कै. हणमंत सदाशिवराव कसबे यांच्या १४ व्या स्मृती दिनानिमित्त फेरेन्डस क्लब व रे.आफ होप फाऊंडेशन यांच्या विद्यमाने रक्तदान शिबीर महात्मा फुले नगर येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सभागृह औसा येथे दि.२६ अॉगस्ट २०२० बुधवार रोजी घेण्यात आले.या शिबिरात ११४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानासाठी लातूर ब्लड बँकेचे डॉ अमोल सर, डॉ नयन पाटील, डॉ कोमल कोकाटे, डॉ सरीता माळी, यांनी सहकार्य केले.शिबिराच्या यशस्वितेसाठी फेरन्डस क्लबचे धम्मदिप जाधव, गोपाळ धानुरे, सर्व समाज सेवक बांधवांनी योगदान दिले. कै.हणमंत सदाशिव कसबे यांच्या स्मृतीस श्रीशैल्य उटगे यांनी आदरांजली वाहिली व गोवींद जाधव, नगरसेवक अंगद कांबळे, सतीश जाधव शाहुराज कांबळे,, समाज सेवक जयराज कसबे, नगरसेविका मंजुषा हजारे, हणमंत राचट्टे, श्रीमंत क्षीरसागर, संभाजी शींदेआदिनीही आदरांजली वाहिली.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात ठेवून सोशल डिस्टंन्स ,मास्क, आरोग्य सेतू अॅपचे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला.कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारी मुळे राज्यात होत असलेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात ठेवून ११४ रक्तदात्यांनी दिलेल्या रक्तदानाचे कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.