कोरोना बाधितांवर वेळीच योग्य उपचार व्हावेत यासाठी-- राज्यात भारतीय जैन संघटना करणार

 

कोरोना बाधितांवर वेळीच योग्य  उपचार व्हावेत यासाठी
---------------------------------------------------------------
राज्यात भारतीय जैन संघटना करणार
पाच हजार प्लाझ्मा दात्यांचा शोध
लातूर, दि. १९ : नेहमीच निःस्वार्थ  भावनेने प्रेरित होऊन समाज कार्यात
अग्रेसर असणाऱ्या भारतीय जैन संघटना अर्थात बीजेएसने कोरोना बाधित
रुग्णांवर वेळीच योग्य  उपचार व्हावेत यासाठी राज्यभरातून पाच हजार
प्लाझ्मा दाते शोधण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. प्लाझ्मा
दात्यांचा शोध घेऊन बीजेएस संबंधितांची यादी शासकीय यंत्रणेकडे सुपूर्द
करणार आहे.
        सध्या सगळीकडे कोरोना विषाणूने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे.
अनेकांना या विषाणूने आपल्या जाळ्यात ओढले आहे. दुर्दैवाने हजारोंच्या
संख्येने निरपराध बळीही गेले आहेत, तर सुदैवाने कोरोनावर मात करणाऱ्यांची
संख्याही मोठी आहे. निसर्गतःच कोरोनावर मात  केलेल्या व्यक्तींच्या
शरीरात कोरोनाग्रस्ताला वाचविणाऱ्या मारक द्रव्याची अँटीबॉडीज ची
निर्मिती होत असते.  कोरोनावर मात केलेल्या व्यक्तीच्या प्लाझ्मा मध्ये
हा महत्वपूर्ण घटक असतॊ. आजपर्यंत जगात कोरोनावर उपयुक्त ठरेल अशी लस
शोधण्यात आली नाही. जगभरातील शास्त्रज्ञ त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत
आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल, अशी शक्यता दिसून येत
आहे. मात्र, तोपर्यंत आणखी किती कालावधी उलटेल हे सांगता येत नाही.
त्यासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथा यांच्या
संकल्पनेतून प्लाझ्मा दाते शोधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
बीजेएस ने हाती घेतलेल्या प्लाझ्मा डोनर्स जीवनदाता योजनेमुळे कोरोना
बाधितांना जीवदान देणे शक्य होणार आहे. संपूर्ण राज्यात राबविण्यात
येणाऱ्या या योजनेमध्ये लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून प्लाझ्मा
दाते शोधले जाणार आहेत. त्याकरिता भारतीय जैन संघटना एक फॉर्म उपलब्ध
करून देणार असून त्याद्वारे  प्लाझ्मा दात्याची  संमती  घेतली जाणार आहे.
अर्थात हे सर्व करीत असतांना  संबंधितास त्याचे महत्वही पटवून दिले जाणार
असून आपल्यामुळे कोरोनाबाधितांचे प्राण कसे वाचवले जाऊ शकतात, हे
सांगितले जाणार आहे. वयाची १७ वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही
कोरोनापासून मुक्त झालेल्या व्यक्तीस आपला प्लाझ्मा दान करता येतो.
याकरिता लातूर शहराच्या विविध भागांमध्ये १५ ठिकाणी हे फॉर्म उपलब्ध करून
देण्यात आले आहेत. सामाजिक भावनेने प्रेरित होऊन बीजेएसच्या वतीने हाती
घेण्यात आलेल्या या उपक्रमात  लातूर शहर व जिल्ह्यातील कोरोनापासून मुक्त
झालेल्या समाजबांधवांनी आपला सहभाग नोंदवून या राष्ट्रीय कार्यात आपले
उचित योगदान द्यावे, असे आवाहन सुनील कोचेटा, अभय शहा, केयूर कामदार, डॉ.
कंडारकर, डॉ. पी.के. शहा, पारस चापसी,  सुरेंद्र कंडारकर, सुरज शहरकर, अशोक सोलंकी
, पारस वरखेडकर , संतोष उमाटे, किशोर जैन ,श्रेयांस बोरा यांसह
बीजेएसच्या लातूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
--------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या