*इथल्या शोषित-पीडित-आदिवासी-बहुजनांना स्वातंत्र्य मिळाले काय ?* *भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांचा प्रस्थापितांना मर्मभेदी सवाल.*

 *इथल्या शोषित-पीडित-आदिवासी-बहुजनांना  स्वातंत्र्य मिळाले काय ?*


*भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांचा प्रस्थापितांना मर्मभेदी सवाल.*




अशोकभाऊंच्या हस्ते मुंबईत ध्वजारोहण.!!


लातुर प्रतिनिधी:----


                    भारतीय स्वातंत्र्याचा ७४ वा स्वातंत्र्यदिन *भिम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपापल्या जिल्ह्यात साजरा केला. भिम आर्मीचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य आणि भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांनी सुद्धा मुंबईत विविध ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांच्या उत्साहाला द्विगुणित केले.*

                     मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे *कुर्ला* ह्या ठिकाणी *भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांनी धम्म विकास मंडळाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून  ध्वजारोहण केल्याची माहिती भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे  दिली आहे.

              ह्याप्रसंगी राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांनी गेल्या ७४ वर्षाच्या भारतीय राजकारणाचा धांडोळा घेऊन "ह्या देशात मूठभर लोकांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले पण हा देश ज्यांच्या रक्तावर-घामावर पोसल्या गेलाय , ज्यांच्या देहाच्या बलिदानांवर हा देश उभा आहे त्या शोषित-पीडित-आदिवासी आणि बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळाले काय ?" असा रोखठोक मार्मिक सवाल इथल्या प्रस्थापितांना विचारला.*

             ह्यावेळी धम्म विकास मंडळाचे पदाधिकारी-स्थानिक नागरिक-आबालवृद्धांसह लहानगे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्यावेळी उपस्थितांना मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आल्याची माहिती भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या