करिअर फेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन
रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचा उपक्रम
लातूर/प्रतिनिधी:दहावी,
बारावी,पदवी झाल्यानंतर पुढे काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने करिअर फेस्ट हा उपक्रम राबवण्यात आला.पाच दिवसांच्या या उपक्रमात मान्यवरांनी भविष्यातील संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.जवळपास १३ हजार विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
दहावी- बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकही संभ्रमात असतात. सर्व बाबींचा विचार करून,योग्य मार्गदर्शन घेऊन करिअरची निवड करणे महत्त्वाचे असते.आज उच्च शिक्षणाला स्पेशलायझेशन, स्किल बेस्ड लर्निंग तसेच मल्टी डिसिप्लिनरी ॲप्रोच या महत्त्वाच्या घटकांची जोड मिळाली आहे.योग्य माहितीच्या आधारे निवडलेले करिअर विद्यार्थ्यांची बौद्धिक, नैतिक क्षमता वाढवत नाही तर देशाची सामाजिक, आर्थिक बाजूदेखील बळकट करते.यासाठीच रोटरी क्लब ऑफ़ लातूर मिडटाऊनने दहावी, बारावी, पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दि.११ते १५ऑगस्ट दरम्यान करिअर फेस्ट आयोजित केले होते. दररोज सायंकाळी ४ ते ७ या कालावधीत हा कार्यक्रम ऑनलाईन संपन्न झाला.यात विज्ञान, वाणिज्य, कला, इव्हेंट मॅनेजमेंट, पत्रकारिता आदी विषयांबाबत आयपीएस विश्वास नांगरे पाटील,अविनाश धर्माधिकारी,संदीप पाठक,उदय निरगुडकर,प्रा.मोहन देशपांडे ,डॉ.धनंजय गायकवाड,राजेश बर्गे,राहुल बोधनकर,योगीराज देवकर,कॅप्टन श्रीकांत वलवाडकर,प्रा डॉ शंकर नवले,प्रा.शारंगपाणी कट्टी,सीए आदेश नहार यांनी मार्गदर्शन केले.
या सेमिनार मध्ये कोव्हीड १९ नंतरच्या शैक्षणिक संधी,पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक संधी,वाणिज्य शाखेच्या विध्यार्थ्यांसाठीच्या संधी,विविध स्पर्धा परीक्षा,सीडीएस परीक्षा, नाट्य आणि कला क्षेत्रातील संधी आदी विषयांवर उहापोह करण्यात आला.एकूण १३ हजार विद्यार्थी यात ऑनलाईन सहभागी झाले.
रोटरी क्लब ऑफ़ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष अनुप देवणीकर ,सचिव रविंद्र
बनकर,प्रोजेक्ट चेअरमन यश कुलकर्णी,लिटरसी संचालक जगदीश कुलकर्णी व पब्लिक इमेज संचालक अमोल दाडगे यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.