भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची गुणवत्तेची परंपरा कायम

 

भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची गुणवत्तेची परंपरा कायम



लातूर दि.08/08/2020
रेणापूर तालुक्यातील पळशी येथील भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यालयाचा 12 वी निकाल 93.75 तर 10 वी निकाल 94.52 टक्के लागलेला आहे.
यामध्ये इयत्ता 10 वीच्या परीक्षेत विवेक देशमुख 94.40 टक्के गुण घेवून प्रथम आलेला आहे. तर दिपाली मोदामे ही विद्यार्थीनी 92.60 टक्के गुण घेवून द्वितीय आलेली आहे. तर योगिता पाटील ही विद्यार्थिंनी 92.20 टक्के गुण घेवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. तर 10 वी मध्ये अनिषा जाधव 81.07 टक्के गुण घेवून प्रथम, वैष्णवी शिंपले 77.02 टक्के गुण घेवून द्वितीय आली आहे तर अभिजीत ससाणे हा विद्यार्थी 74.01 टक्के गुण घेवून तृतीय आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव, सचिव रामदास जाधव, यांच्यासह संस्थेचे इतर संचालक, मु.अ.विनायक टेकाळे,प्रा.रमाकांत जाधव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
--------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या