“दयानंद” च्या वेध वार्षिकअंकाचे
माजी आ.कव्हेकरांच्या हस्ते प्रकाशन
माजी आ.कव्हेकरांच्या हस्ते प्रकाशन
लातूर दि.08/08/2020
दयानंद कला महाविद्यालयाच्या वार्षिक अंक “वेध-2019” चे प्रकाशन जे.एस.पी.एम.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, भाजपा युवा मेोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर, प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य अनिल माळी, मुख्य संपादक डॉ.बालाजी घुटे, डॉ.सुभाष कदम, प्राध्यापक दुर्गा शर्मा, अधिक्षक नवनाथ भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
नागरिकत्व कायदा-समज व गैरसमज ही मध्यवर्ती संकल्पना घेवून या संदर्भात लीखित साहित्य विद्यार्थ्यांकडून मागविण्यात आले होते. 2019 हे वर्ष संपूर्ण देशात सी.ए.ए., एन.आर.सी., एन.पी.आर. व सी.ए.बी. यामुळे गाजले. संपूर्ण देशभरात या कायद्याच्या समर्थनात व विरोधात मोठे आंदोलने चालली ही सर्व आंदोलने खूप संवेदनशील पण लोकशाही मार्गाने चालली. वाद, चर्चा, मतभेद व संवाद हे लोकशाहीत आवश्यक असतात. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीही अशा मुद्यावर संवेदनशील असतो. त्याला अभिव्यक्त होता यावे. यासाठी महाविद्यालयाने मध्यवर्ती कल्पना घेवून या सर्व संकलित साहित्याचे संपादन करून वेध हा वार्षिक अंक प्रकाशीत करण्यात आला. संस्थेच्या विविध युनिट उपक्रमाची पाहणी केली तसेच संस्थेच्या पायाभुत सुविधा,नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून विद्यार्थी घडविण्याचे कार्य चालू ठेवलेले आहे.त्याबद्दल संस्थासचिव रमेश बियाणी व त्यांचे पदाधिकारी यांचे कव्हेकरसाहेब यांनी कौतुक केले.यावेळी जे.एस.पी.एम.संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दयानंद महाविद्यालयाच्यावतीने चालू करण्यात आलेल्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीची पाहणी केली.यावेळी त्यांनी ऑनलाईन शिक्षणाबाबत संवाद साधून विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.