प्रा. ज्योत्स्ना गव्हाणे यांना पीएचडी
लातूर/ प्रतिनिधी ः प्रा. ज्योत्स्ना भागवतराव गव्हाणे (सौ.ज्योत्स्ना गोपाळ पवार) यांनी ‘लातूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत सर्व शिक्षा अभियान अंतर्गत राबविल्या जाणार्या या उपक्रमाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयात सखोल अभ्यास करुन संशोधनात्मक प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे त्यांना दि. 30 जूलै 2020 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
श्रीमती सुशिलादेवी देशमुख महिला अध्यापक विद्यालय, लातूर येथे कार्यरत असणार्या प्राध्यापक ज्योत्स्ना गव्हाणे यांनी या संशोधनात्मक अध्यापन आणि संशोधनाच्या कार्यात त्यांना आंतर विद्याशाखेचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे व डॉ. बालाजी गिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरील विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडमधून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. आ. दिलीपरावजी देशमुख साहेब, मा. ना. अमितभैय्या विलासराव देशमुख साहेब (वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, लातूर), लातूर ग्रामीणचे आमदार धिरजभैय्या देशमुख साहेब, प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख, आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. वैजयंता पाटील, शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रा. डॉ. चंद्रकांत बाविस्कर, प्राचार्य डॉ. अजय पाटील, प्राचार्य डॉ. सुनिल मुळजे, प्रा. डॉ. गोपाळ पवार, रयत प्रतिष्ठान, लातूर अभिनव अध्यापक महाविद्यालय, लातूर श्रीमती सुशिलादेवी देशमुख महिला अध्यापक विद्यालय, लातूर आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रा. ज्योत्स्ना गव्हाणे यांचे अभिनंदन केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.