शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा यांनी राजीनामा देऊन मौनव्रत धारण करावे.
- व्यंकटराव पनाळे
लातुर : दि. २३ - कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर चे सभापती ललितकुमार शहा यांनी शेतकऱ्यांना अरेरावीची व उर्मटखोरपणाची भाषा करून यापुढे मला शेतकऱ्यांनी फोन करू नये असे बोलणाऱ्या सभापतींनी राजीनामा देऊन आपल्या घरात मौन व्रत धारण करून बसावे असा भाजपा नेते व्यंकटराव पनाळे यांनी इशारा दिला आहे.
काल दिनांक २२ ऑगस्ट वार शनिवार रोजी सकाळी ११ वाजता शेतकरी विक्रम झामरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित भाजी मंडई मध्ये खूप चिखल झाला आहे. शेतकऱ्यांनी शेतामध्ये कष्ट करून पिकवून आणलेला भाजीपाला विक्रीसाठी नीट घेऊन बसता ही येत नाही. भरपूर चिखल आणि घाण झाली असल्यामुळे याठिकाणी तातडीने मुरूम टाकण्यात यावा. या मागणीसाठी फोन लावला असता ललितकुमार शहा यांनी माझा वर्षभरातला अत्यंत महत्त्वाचा सण असून आज माझे मौनव्रत आहे तुम्ही फोन करून माझे मौनव्रत तोडले. तुम्हाला मार्केट कमिटीच्या सचिवाला भेटता येत नाही का ? मला कशासाठी फोन करून त्रास देत आहात. कोण शेतकरी फितकरी मला माहित नाही यापुढे मला शेतकऱ्यांनी फोन करायचा नाही. भाजीपाला चिखलात फेकून द्या नाहीतर कलेक्टर च्या दारात नेऊन टाका. मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. अशी उर्मट भाषा करून शेतकऱ्यांचा अवमान केला. कलेक्टर ला भेटून मला मार्केट कमिटीच्या सभापती पदावरून काढून टाका अशी दांभिकपणाची भाषा केली. शेतकऱ्यांची संस्था असलेल्या सभापतिपदाच्या खुर्चीत बसून कष्टकरी शेतकऱ्यांना वाटेल ते बोलणाऱ्या सभापती ललितकुमार शहा यांनी शेतकऱ्यांनी खुर्चीवरून ओढून भाजी मंडईतल्या चिखलात लोळवण्यापूर्वी सभापती पदाचा राजीनामा देऊन आपल्या घरात मौनव्रत धारण करून बसावे. ज्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी समजत नाहीत आणि शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे घातलेले सहन होत नाही त्यांनी राजकारण करू नये. डिझेल पेट्रोल विकल्या जाणाऱ्या पंपावर चमकदार पेवर ब्लॉक करता आणि ज्या ठिकाणी शेतकरी कष्ट करून पिकवुन भाजीपाला विक्रीसाठी भाजी मंडई मध्ये आणतो, या ठिकाणी शेतकर्यांचा भाजीपाला चिखलात ठेवायला सांगता. शेतकऱ्यांच्या संस्थेतील सभापती पदावर बसून बोलताना जीवाला लाज वाटत नाही का.
सभापती ललितकुमार शहा यांनी शेतकऱ्यांना चुकीची भाषा वापरल्याबद्दल शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अन्यथा शेतकऱ्यांच्या बाबतीत अशी भाषा वापरल्याबद्दल खुर्चीवरून खाली ओढून त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा गंभीर इशारा भाजपा नेते व्यंकटराव पनाळे यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.