कुक्कुट मांस कुक्कुट उप्तादने यांचा नोव्हेल कोरोना विषाणूशी संबंध नाही

 कुक्कुट मांस कुक्कुट उप्तादने यांचा

 नोव्हेल कोरोना विषाणूशी संबंध नाही


लातूर,दि.20(जिमाका):-महाराष्ट्र राज्य व कुक्कुटपालन व्यवसायामध्ये देशात अग्रेसर आहे. सन 2019 च्या 20 व्या पशुगणनेनुसार राज्यामध्ये एकूण कुक्कुट संख्या 7 कोटी 42 लाख इतकी आहे. कुक्कुट पक्ष्यांमध्ये होणारे विविध रोग व नियंत्रण हा व्यवसायामधील यशस्वी होणेसाठीचा सर्वात महत्वाचा मुलमंत्र आहे. चीन या देशामध्ये आलेल्या नोव्हेल कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर (सोशल मिडिया, फेसबुक व व्हॉट्सअपव्दारे ) आपल्या देशात व राज्यात कुक्कुट मांस व इतर कुक्कुट उत्पादने यांच्या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्त्रीय अफवा पसरविल्या जात आहेत.

राज्यातील कुक्कुट पालन व्यवसायाशी लाखो शेतकरी यांचे चरितार्थ व हित निगडीत आहेत. मका व सोयाबीन उत्पादक शेतकरी विशेषत:कुक्कुट पालन उद्योगाशी संलग्न आहेत. तसेच कुक्कुट व्यवसाय राज्याच्या विकासाशी जोडले आहे. कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा नोव्हेल कोरोना विषाणू प्रार्दुभावाशी कोणताही संबध नाही. कुक्कुट मांस व उत्पादने मानविय आहारामध्ये वापरासाठी पुर्णपणे सुरक्षीत असून नागरीकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे व या बाबत कांही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा.

नोव्हेल कोरोना विषाणू हा सांसर्गिक असुन  एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस संक्रमीत होतो. तथापी कुक्कुट पक्षामधील विषाणू (इन्फेक्शीअस ब्रॉकायटीस ) मानवामध्ये संक्रमीत होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. कुक्कुट मांस कुक्कुट उत्पादने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये नोव्हेल कोरोना विषाणू संक्रमीत झाल्याचे संदर्भ नाहीत. आपल्याकडे चिकन व मटण उकळून शिजवून सेवन केले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहु शकत नाही.

तरी ग्राहकांनी सोशल मिडिया , फेसबुक व व्हॉट्सअप इत्यादी माध्यमातील विषयास केलेल्या माहिती ,बातम्या, अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्या कडील कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांचा नोव्हेल कोरोना विषाणू शी संबंध नाही व ती आहारात वापरण्यासाठी पुर्णत:सुरक्षीत आहेत असे सह आयुक्त पुशसंवर्धन रोग व अन्वेषण विभाग, औध, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या